संगमनेर | झुंजार न्यूज
समाज्यातील लोकाकरिता अहोरात्र काम करणारा व मनाचा घराचा दरवाजा कोणासाठीही केव्हाही उघडा ठेवणारा कार्यकर्ता म्हणून केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष भाऊ शेळके यांची सर्वदूर ओळख आहे.

समाज्याच्या न्याय हक्काकरिता लढे ते रस्त्यावर तर लढलेच; पण त्याचबरोबर अगदी शासकिय कार्यालयात कागदोपत्रासह बाजू मांडण्याचे काम केले शहर असो या ग्रामिण भाग असो नि:स्वार्थीपणे मोठं – मोठे मोर्चे , आंदोलने करणार एकमेव तरुण कार्यकर्ता म्हणजे आशिषभाऊ शेळके असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. रिपब्लिकन पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर गेल्या १५ – २० वर्षापासून संगमनेर तालुक्याची पक्षाची धुरा सोपवली आहे. शेळके यांचा जन्म हा संगमनेर तालुक्यातील उंबरी – बाळापूर येथे झाला असून त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातचं झाले तर माध्यमिक शिक्षण हे आश्वी येथे झाले . बालवयातचं शेळके यांना सामाजिक काम करण्याची आवड व छद असल्याने आपल्या गोड व प्रेमळ स्वभावातून तरुणांना आकर्षण करणे ही त्यांची हातोटी असल्याने वयाची मर्यादा नसणारे सर्व कार्यकर्ते त्यांच्या आवती – भोवती जमताना दिसत आहे .

आशिष शेळके यांनी रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढविण्याकरिता तालुक्यात आदीवाशी , मुस्लीम , हिंदूसह विविध समाज्यातील लोकांची मोट बांधली . प्रत्येकांना आप – आपल्या परी काम करण्याची संधी दिली . विविध समाज्यातील महीला आघाडी बनवत महिलांना रिपब्लिकनच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करुन दिले . संगमनेर तालुक्यातील काही गावे ही शिर्डी विधानसभा मतदार संघात गेल्याने साहजिकचं थोरात – विखेच्या बाल्लेकिल्ला काम करताना मोठया अडचणी निर्माण झाल्या मात्र प्रामाणिक व ध्येयनिष्ठ राहून आदीवाशी , दलित , मुस्लिम , ठाकर , मराठा , धनगर समाज्यातील युवकांना, महिलांना, मध्यमवर्गीयांना रिपब्लिकन पक्षाकडे वळवण्याकरिता मोठा संघर्ष करत या सर्वाची तालुक्यात एक मोट तयार करत गावो गावी , वाडया – वस्त्यांवर रिपब्लिकन झेंडा फडकविला .

आपल्या संघर्षमय जीवनात समाज्यातील , तळागाळातील लोकाच्या हक्काकरिता रस्त्यावर उतरून लढाई केली . रस्ता रोको , आंदोलने , मोर्चे काढले मग ते कुठल्याही समाज्याचा माणुस असू दया त्यांच्याकरिता आपली ताकद पणाला लावली . तर पक्षाच्या विविध कार्यक्रम तालुक्यात घेवून एक ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला २०२४ च्या लोकसभा निवडणुकी पुर्वी केंद्रीय मंत्री ना . रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान सन्मान सोहळा स्वखर्चातून एक यशस्वी कार्यक्रम करुन दाखवित आपली फार मोठी ताकद निर्माण केली . नि:स्वार्थी , हसमुख व सर्व गुण संप्रन्न असणारे व्यक्तीमत्व म्हणजे आशिषभाऊ शेळके हे हवेहवेसे वाटणारे मात्र परिस्थितीनुसार कठोर निर्णय घेणारे आज तालुक्यात रिपब्लिकन नेतृत्व निर्माण झालेले असून तालुकास्तरीय रामदास आठवलेच्या रुपामधून आशिष शेळके यांनी पाहिले जात आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवकांनी , कार्यकर्त्यांनी अभिष्टचिंतन करण्याचे ठरविले . त्या नुसार वृक्षारोपन , रक्तदान शिबीरासह विविध सामाजिक उपक्रमातून अभिष्टचिंतन सोहळा होणार असून या सोहळ्यास झुंजार न्यूज तर्फे शुभेंच्छा !
