राजकारणाची चांगली संस्कृती व परंपरा पुढे न्या- आमदार थोरात
संगमनेर | झुंजार न्यूज
स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या ऐतिहासिक शहागडावर विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर पारंपारिक वाद्य, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजर, सूर आणि सांभाळाच्या साथीने भारावून टाकणाऱ्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांबरोबर तालुक्यातील 171 गावांमधील तरुणांशी संवाद साधण्याकरता डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद यात्रेचा प्रारंभ झाला असून संगमनेर तालुक्याच्या चांगल्या राजकारणाची संस्कृती पुढे घेऊन जा अशा शुभेच्छा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत

पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद यात्रेचा प्रारंभ लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मा. आ. डॉ सुधीर तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ , ॲड माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे ,रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे, विश्वासराव मुर्तडक, विलासराव कवडे ,सोमनाथ गोडसे, शांताराम डूबे, आर.बी. राहणे, सुधाकर जोशी, विष्णुपंत रहाटळ, सरपंच द्वारकाताई दुबे, संजय हिरे ,सोमेश्वर दिवटे, उपाध्यक्ष सुभाष सांगळे, सचिन खेमनर , गौरव डोंगरे, वैष्णव मुर्तडक, हर्षल राहणे ,प्रदीप हासे, संदीप दुबे, सुरेश झावरे, नितीन अभंग, शैलेश कलंत्री, सतीश खताळ, स्वप्नील कोल्हे आदींसह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, 1985 च्या निवडणुकीने तालुक्यात नव्या इतिहासाला सुरुवात केली. तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली . सततच्या विकास कामांमधून आज संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील असलेल्या तालुक्यांमध्ये आहे. येथील शिक्षण सहकार बंधूभावाचे वातावरण अत्यंत चांगले वातावरण आहे. हीच परंपरा तरुणांना पुढे न्यायची आहे.

निवडणुकीमुळे अनेक जण येतील. मने दूषित करण्याचा प्रयत्न करतील. परंतु अशांना वेळीच रोखा. युवा काँग्रेसच्या माध्यमातून युवा संवाद गावोगावी जाणार आहे. अनेक युवक जोडले जातील. युवक चळवळीतून कार्यकर्ते घडत असतात. शहाजीराजांनी याच ठिकाणाहून स्वराज्याची संकल्पना मांडली. सर्वधर्म समभाव जोपासणारा विचार आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचं असल्याचे ते म्हणाले

तर डॉ सुधीर तांबे म्हणाले की, सध्या संविधान धोक्यात आहे. चांगल्या भारतासाठी तरुणांनी एकत्र आले पाहिजे .स्वतःची क्षमता दाखवा .आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सभ्यतेची, प्रेमाची, बंधूभावाची संस्कृती निर्माण केली असून ती जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहा असे सांगितले.

तर डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, युवा संवाद यात्रा ही बारा दिवस चालणार असून तालुक्यातील 171 गावे व २५८ वाड्यांनवास्त्यांवरील तरुणांशी संवाद साधणार आहे. ही यात्रा स्वाभिमानासाठी असून संगमनेर तालुक्यात डोंगर , द-या ,नदी परिसर, पठार भाग, दुष्काळी पट्टा अशी भौगोलिक परिस्थिती आहे. या सर्व भागांचा अभ्यास तरुणांना करायचा आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्यातील चांगल्या राजकारणाची संस्कृती आणि स्वाभिमान प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुण काम करणार असून खबर्यांचा बंदोबस्त ही युवा पिढीकडे करेल असे त्यांनी सांगितले.

यावेळी देवीची आरती केल्यानंतर तिरंगा ध्वज आमदार बाळासाहेब थोरात व मान्यवरांच्या उपस्थितीत युवा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांच्याकडे घोषणांच्या निनादात सोपवण्यात आला .या कार्यक्रमासाठी तालुक्यातील 5000 युवक व युवती यांसह पेमगिरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

12 दिवसात 500 किलोमीटरचा प्रवास
डॉ जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 171 गावे व 258 वाड्यावास्त्यांवर जाऊन युवक काँग्रेसचे हजारो तरुण 12 दिवसांमध्ये 500 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत . यावेळी युवा संवाद यात्रेतील सर्व तरुण तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाबरोबर येथील समृद्ध परंपरा याबाबत विविध गावांमधील युवक, नागरिक व महिला या सर्वांच्या बरोबर ते संवाद साधणार आहेत
Post Views: 700

