{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज

संगमनेर विधानसभा मतदारसंघात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात उमेदवारीचे सूतोवाच केल्यापासून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन सुरूच ठेवले आहे. शुक्रवारी (दि. १८) तालुक्यातील तळेगाव दिघे येथे झालेल्या युवा संकल्प मेळाव्यात त्यांनी पुन्हा थोरात यांना आव्हान दिले. ‘ते मुख्यमंत्री काय, यंदा आमदारसुद्धा होणार नाहीत’ अशा शब्दांत त्यांनी थोरातांवर निशाणा साधला.
तालुक्यातील ठेकेदारी संस्कृती तुमचा विकास करू शकणार नाही, या तालुक्यात परिवर्तन करण्यासाठी महिलांचा वाटा खूप मोठा असणार आहे. युवकांनी सुद्धा मागे न राहता, दहशत झुगारून परिवर्तनासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. विखे पाटील यांनी थोरातांच्या चाळीस वर्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. वर्षानुवर्ष या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवू न शकलेले कोणत्या विकासाची भाषा करतात, असा प्रश्न करून या तालुक्यात फक्त नातेवाइकांसाठी राजकारण झाले. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed