आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ येथील ताजणे मळा येथे बंद असलेल्या काही खोल्यामधून दुर्गंधी व डासाच्या थैमानाने आजू बाजूच्या रहिवाश्यांना आजारा आमत्रंण देत असल्याचे पाहणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टर व ग्रा प पदाधिकाऱ्यासमोर तक्रारीचा पाढा वाचल्याने संबंधीतांनी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी होत आहे .

सदर ताजणे मळ्यातील एका मुलाचा डेग्यू सदृश्याने मृत्यु झाला या परिसरात असणाऱ्या खडुयातील साचलेल्या पाण्यामुळे डेग्यु लागण झाल्याची संशय व्यक्त झाला मात्र या परिसरात तातडीने निमगांव जाळी येथील डॉक्टर महाराज व डॉ सौ शेख यांच्यासह ग्रामपचायत पदाधिकारी यांनी पाहणी केली असता असे कुठलेचं पाण्यानी खड्डे भरलेली आढळली नाही तर काही ठिकाणी बंद असलेल्या खोल्या असल्याने यामध्ये घुस व उदारांचे उकलेल्या मातीतून असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले तसेचं येथून दुर्गंधी ही येत असल्याने येथे डासाचे निर्मिती झाली असावी असे डॉक्टरांनी यांनी सांगितले .

यावेळी संरपच नामदेव शिंदे , उपसंरपच सौ अरुणा हिंगे , ग्रा प सदस्य अभिजीत ताजणे , अजझर शेख , गिताराम गायकवाड , संतोष ताजणे , किशोर पाटील , नितीन ताजणे , बबन ताजणे , अशोक ताजणे , बाळासाहेब मदने आदी उपस्थित होते .

ताजणे मळा व परिसरातील लोकांचे आरोग्य चांगले रहावे व परिसर स्वच्छ रहावे म्हणून ग्रामपचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी फवारणी केली जाते मात्र काही विरोधकांकडून गैरसमज पसरवून परिसर अशांत करण्याचा प्रयत्न होत आहे .
अभिजीत ताजणे ( सदस्य , ग्रा प आश्वी बु॥ )
