{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

श्रीरामपूर । झुंझार न्यूज

 

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या कार्यालयाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत विना क्रमांकाचे टाटा इंट्रा पिकअप वाहन आणि त्यातील सुमारे २ ब्रास वाळू असा एकूण ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालकासह वाहनमालकाविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मुठेवाडगाव शिवारात खानापूर ते वडाळा महादेव रोडवर काही व्यक्ती टाटा इंट्रा पिकअपमधून अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच कारवाई करण्याच्या सूचना अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

त्यानुसार पोहेकॉ सचिन धनाड, अनिल शेंगाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अक्षय भोसले यांचे पथक खासगी वाहनाने घटनास्थळी रवाना झाले. पथकाने मुठेवाडगाव शिवारात खानापूर ते वडाळा जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला सापळा रचला.

सापळा रचून थांबले असता बातमीमध्ये नमूद केल्याप्रमाणे खानापूरच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाचे, विना क्रमांकाचे टाटा इंट्रा पिकअप वाहन येताना पथकाला दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले.

पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव साहेबराव मारुती गायकवाड (वय २४, रा. खानापूर, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. वाहनाच्या हौद्यातील मालाबाबत विचारणा केली असता त्यामध्ये वाळू असल्याचे त्याने सांगितले.

वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे चौकशीत स्पष्ट
पोलिसांनी वाळू वाहतुकीचा वैध परवाना आहे का, याबाबत विचारणा केली असता चालकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. तसेच सदर वाहनाचे मालक सुनिल देवकर (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली.

यानंतर पोलिसांनी वाहनातील अंदाजे २ ब्रास वाळूसह विना क्रमांकाचे टाटा इंट्रा पिकअप वाहन ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या वाहन व वाळूची एकूण किंमत ३ लाख ५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.


या प्रकरणी चालक साहेबराव गायकवाड आणि वाहनमालक सुनिल देवकर यांच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४००/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोहेकॉ सचिन धनाड, अनिल शेंगाळे, रामेश्वर वेताळ, संतोष दरेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अक्षय भोसले सहभागी होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *