झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील साकुर येथील जाधव कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली. त्यांनी कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देत दुःखात सहभागी होत आधार दिला.

साकुर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सहदेव जाधव , भीमराज जाधव यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पाश्चात सुना, दोन मुलं, एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे. शालिनीताई विखे पाटील यांनी कुटुंबियांची भेट घेऊन दिवंगतांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व कुटुंबियांचे सांत्वन केले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफभाई शेख, सामाजिक कार्यकर्त्या अमृता ताई कोळपकर, मच्छिंद्र खेमनर, विकास पवार, कविता कोरडे, प्रियंका जाधव, ललिता जाधव, सुयोग जाधव, गजानन कोरडे आदी सह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *