संगमनेर | झुंजार न्यूज
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे एका अंगणवाडी सेविकेच्या बलात्कार व हत्येच्या बातमीने संपुर्ण माहाराष्ट्र हादरला; तर सायंकाळी संगमनेरच्या एका राजकीय सभेमध्ये काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्यावर झालेली अत्यंत खालच्या पातळीचे टीका म्हणजे समाज्यातील स्त्री जातीला कलंकित करण्याचा प्रकार घडत असल्याने या दोन्हीही घटनांचा बहुजन वंचित नेत्या उत्कर्षाताई रुपवते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्रारे तीव्र निषेध व्यक्त केला .
प्रसिध्दी पत्रकात उत्कर्षा रुपवते पुढे म्हणाल्या की , अहिल्यानगर जिल्हयातील या दोन्ही घटना निंदणीय असून स्त्री जातीचा काय सन्मान होता यावरुन हे समजते एकीकडे माझी लाडकी बहिण म्हणायचं आणि दुसरीकडे तिचा अनादार करायचा हिचं का ? संस्कृती असा प्रश्न उपस्थित करत अशा वाचांळाना अदल घडविली पाहिजेल तर खून बलात्कार करणाऱ्या योग्य ते कठोर कारवाई होणे गरजेचे या दोन्ही घटनेचा वंचित बहुजन पक्षाकडून निषेध व्यक्त करत आहे तर सदर घटनांचा राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांना योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या आहेत.
महाराष्ट्रामध्ये महिलांविरुद्ध वाढत असलेल्या ‘सगळ्याच प्रकारांच्या हिंसाचाराचा’… अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे हे निश्चित या घटनेवरून दिसत आहे .
