कर्जत l झुंजार न्यूज

विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून गट – तटामध्ये बैठकाच्या धडका सुरु असल्याने रिपाई ( आठवले ) व जेष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकारी – कार्यकर्ते एकत्र येत निवडणुकीच्या संदर्भात चर्चासत्र घडून आणण्यासाठी रविवार दि २७/१०/२०२४ रोजी दुपारी १ वाजता अक्काबाई नगर ( कर्जत )  संयुक्त बैठक आयोजित केली असल्याची माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे यांनी दिली .
लोकसभा निवडणुकीत रिपाई ग्राफील ठेवत रामदास आठवले इच्छुक असताना सुध्दा शिर्डीची जागा महायुतीने दिली नाही यांच्या रोष हा कार्यकर्ता मध्ये असून पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत श्रीरामपूरसह राज्यात ८ जागेची रिपाई नी मागणी केली मात्र याबाबत कुठल्याही प्रकारे ठोस निर्णय होताना दिसत नाही कारण भाजपा शिंदे – पवार यांनी आप – आपल्या जागा जाहिर केल्या अजून काही जागा शिल्लक आहे यात श्रीरामपूर ची जागा सुध्दा शिल्लक आहे तेव्हा अहिल्यानगर जिल्हयातून रिपाईचा आमदार झालाचं पाहिजेल याकरिता जागा मिळणे महत्त्वाचे आहे . मात्र पुन्हा एकदा रिपाई महायुती गुलदस्त्यात ठेवणार तर नाही अशी शंका कार्यकर्त्यांना येवू लागली आहे . कारण वेळोवेळी फसवणुक , अपमान झालेला आहे याचं पार्श्वभूमीवर रविवार कर्जत मधून रिपाई व जेष्ठ नागरिकांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे 
तरी रिपब्लिकन पाटी ऑफ इंडिया व ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकत्यांनी हजर राहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष  शब्बीर भाई पठाण , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश अण्णा भैलुमे , कार्याध्यक्ष शशिकांत दादा पाटील , जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भाऊ कदम , जिल्हा युवक उपाध्यक्ष विशाल काकडे , आरपीआय तालुका उपाध्यक्ष सतीश आल्हाट , कुंडलिक गंगावणे , अमोल देवळे , मल्हारी कांबळे , हरीश साळवे आदीनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed