{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

कर्जत | झुंजार न्यूज

महायुतीचे उमेदवार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा घटक पक्ष रिपब्लिकन पाटी ऑफ इंडिया ( आठवले ) व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “भीम गर्जना ” कार्यकर्ता मेळावा दि ७ नोव्हेबर २०२४ रोजी कर्जत येथील शिव – पार्वती मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश आण्णा भैलुमे यांनी दिली .
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ४ नोव्हेबर ला माघारीच्या दिवशी चित्र निश्चित होणार असले तरी रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतील घटक पक्ष असल्याने महायुतीचा उमेदवारांचा प्रचार करणे हा युतीचा धर्म असल्याने प्रा . राम शिंदे यांच्याचं प्रचार करणे हा श्रेष्ठीचा आदेश आहे त्यामुळे प्रा राम शिंदे प्रचारार्थ भीम गर्जना करत कार्यकर्ता मेळावा होणार असल्याचे भैलुमे यांनी सांगितले .
भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय यांचे अधिकृत उमेदवार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ दि ७ नोव्हेबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे अध्यक्ष रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे हे रहाणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे , भाजपा कर्जत – जामखेड विधानसभा संयोजक प्रवीण दादा घुले पाटील , शब्बीर भाई पठाण , शशिकांत दादा पाटील , दत्ता भाऊ कदम , विशाल भाऊ काकडे , सतीश आल्हाट , मधुकर लोंढे आदीसह मोठ्या संख्येने कर्जत , जामखेड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत .
तरी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन अंकुश भैलुमे यांनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed