{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

 

2024 च्या विधानसभेच्या निवडणुका जाहिर होताचं इच्छुक उमेदवारांनी आप – आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून संगमनेर विधानसभा निवडणुकीत निःस्वार्थी व स्वखर्चाने  युती धर्म पाळत महायुतीच्या उमेदवाराकरिता रिपाई कार्यकर्ते सरसावल्याचे चित्र दिसत आहे .
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीकरिता रिपब्लिकन पक्षाला श्रीरामपूरसह राज्यात ८ जागा मिळावे म्हणून वरिष्ठ पातळीवरुन मागणी चालू होती मात्र कुरघुडयांच्या राजकारणामधून रिपाई पक्षाला जागाचं मिळाल्या नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार युती धर्म पाळायचा व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार करायचा असे सांगण्यात आल्याने संगमनेर विधानसभ निवडणुकीकरिता विखे पाटील यांनी जातीने लक्ष्य घालत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली त्यानुसार कार्यकर्त्यांची फौज निर्माण करत कार्यकर्त्यांची जुळवा – जुळव होत असताना राज्यातसह रिपब्लिकन पक्षाचा एक स्वतः व्होट बँक असल्याने त्यांना डावलून चालणार नसल्याने रिपाई कार्यकर्त्यांची मोठी मदत व्हावी म्हणून स्वतः महसूलमंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेत तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार यांच्याशी संपर्क साधत नाराजी न बाळगता त्यांना प्रवाहात येण्याची आवाहन केल्याने रिपाई कार्यकर्त्यांनी सुध्दा मनाचा मोठेपणा दाखवून महायुतीच्या उमेदवारांकरिता सरसावले ग्रामिण भागातून आशिष शेळके तर शहरातून कैलास कासार यांनी नि:स्वार्थी व स्वखर्चातून कार्यकर्त्यांच्या गाठी – भेटीवर भर देत . एक प्रचाराची मोहिमचं सुरु केल्याने वातावरणात बदलाची भूमिका तयार करण्याचे धोरण आखले .
शहरातून दिपावली सणाच्या निमित्ताने बाजार पेठेतून खरेदी – विक्री करणाऱ्यांच्या भेटी घेत निवडणुकी बाबत असणारी भूमिका मांडत मतदार राजाला दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या .   
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *