कर्जत l झुंजार न्यूज
आगामी विधानसभा निवडणुकीत आ. राम शिंदे यांनी रिपाईसह अल्पसंख्याक आघाडीतील मित्रपक्षांना गृहीत धरू नये असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे उत्तर विभागीय उपाध्यक्ष अंकुशराव भैलुमे यांनी दिला आहे,

तर येत्या सात नोव्हेंबर रोजी मेळावा घेऊन भुमिका जाहीर करण्यात येईल असे सांगितले. आतापर्यंत आम्ही महायुतीचा धर्म पाळला आहे, तरी देखील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाहीत, गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही नाईलाजाने काम केले पण या विधानसभा निवडणुकीत ते शक्य नाही, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती, नगरपंचायत, विविध शासकीय कमिट्या यावर संधी देताना आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते, यामुळे रिपाइंचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत, आमच्या बरोबर सात संघटना आहेत. आमचा निर्णय घेण्यासाठी सात नोव्हेंबर रोजी कर्जत येथील श्रीराम मंगल कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, आमच्याकडे
निर्णायक मतदार आहेत याची जाणीव भाजपने ठेवावी असा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. आज कर्जत येथे रिपाई, भारतीय मातंग शक्ती, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, जेष्ठ नागरिक संघ, भीम गर्जना आदीवाशी पारधी समाज संघटना यांच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली…..

यावेळी रिपाइंचे उत्तर विभागीय उपाध्यक्ष अंकुशराव भैलुमे, भारतीय मातंग शक्तीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर लोंढे, जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, पीपल्स रिपब्लिक कलाडें पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळवे, आदीवाशी पारधी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष शाम भोसले, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कदम, विशाल काकडे , रिपाइंचे प्रसिद्धी प्रमुख अमोल देवळे, शरद शिंदे, अमजद शेख, सागर भैलुमे, बापू डुकरे, प्रशांत होले, सिद्धांत कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सात नोव्हेंबर रोजी कर्जत येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 762
