आश्वी । झुंजार न्यूज

 

 

 

 

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यासह अहमदनगर जिल्हयात आघाडी मारल्याने महसूल मंत्र्यांच्या जिल्हयातचं पुत्रासह दोन्ही जागा गमवावे लागल्याने विखे पाटील यांना जिव्हारी लागल्यानेचं याला बाळासाहेब थोरात जबाबदार असल्याचे ग्राह्य धरुन थोराताच्या होम ग्राऊंडवरचं थोराताना नमोहरम करण्याचे चक्रव्युह विखे पिता – पुत्रांने आखल्याने थोरातांनीही शिर्डी करिता कंबर कसल्याने शिर्डी – संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष्य लागणार असल्याचे चित्र दिसत आहे .
अहमदनगर जिल्हा हा सहकार क्षेत्राचा बाल्लेकिल्ला समजला जातो विखे , थोरात , कोल्हे , काळे , गडाख , राजळे , पिचड , घुले , ढाकणे , पाचपुते , नागवडे , जगताप यांनी आप – आपल्या क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून राजकारणावर पक्कड ठेवली मात्र यापैकी थोरात – विखेनीचं राजकारणात मजल मारली . तसेचं विखे – थोरात हे कॉग्रेस पक्षाच्या तालमीत तयार झालेले नेते होय मात्र एकत्र असताना ही त्यांचा राजकिय संघर्ष दिसून आला . विखेनी आक्रमक तर थोरातांनी सयंमाची भूमिका ठेवली . राजकिय वारेनुसार विखेनी आपली वेळोवेळी भूमिका बदलल्याचे जरी दिसून आले तरी कार्यकर्त्यांची मोठया प्रमाणात फळी जिल्हयाभर पेरुन ठेवली . तर थोरातांनी निष्ठेच्या जोरावर कॉग्रेस पक्ष मजबूत ठेवला . दोन्ही नेते उत्तरेचे असून त्यांचे होम ग्राऊंड हे केवळ ३५ कि मीचे अंतरावर तर थोराताचे मुळ गांव विखेच्या विधानसभा क्षेत्रात येत आहे .
बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळ महसूल मंत्री होते तर राधाकृष्ण विखे पाटील हे महायुती महसूल म्हणून काम करत असल्याने दोन्ही नेते परस्पराविरोधी गटात असल्याने राजकिय शत्रू झालेले आहे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिर्डीतून उबाठाचे वाकचौरे तर दक्षिणेतून राष्ट्रवादी ( शरद पवार ) लंके उमेदवार होते तर महायुतीकडून शिर्डीतून शिंदे शिवसेना लोखंडे तर दक्षिणेतून भाजपाकडून सुजय विखे निवडणुक लढले . या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचा उमेदवार नव्हता मात्र महाविकास आघाडी म्हणून बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी होती थोरातांनी महत्वाची भूमिका बजावली तर रिपाईला शिर्डीची जागा न मिळाल्याने दलित समाज्यात नाराजी निर्माण झाल्याने दलित समाज्यांनी तटस्थ भूमिका घेतली त्यांमुळे महायुतीचे उमेदवार पडले . यांचा राग धरुन डॉ सुजय विखे यांनी संगमनेरवर आपली राजकिय चाल केली विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवत थोरातांना राजकिय खिंडीत ठेवण्याचे चक्रव्युह सुरु करत गटा – गटातून मोठ – मोठ्या सभा घेतल्या मात्र ही गर्दी सभेपुरती होती का ? खरोखर लोकांना बदल हवाय हे समजेनासे झाले . मात्र ज्या वेगाने राजकिय वातावरण निर्मिती होवू लागली असता धांन्दरफळ येथे झालेल्या वांचाळ युक्त वक्तृत्वामुळे गोंधळ उडाला त्यांचे पडसाद राज्यभर उठल्याने राजकिय निर्मितीला ब्रेक लागला गेला . दोन दिवस विचार मंथन झाले बदल खरोखर हवाय का ? जर पाहिजेल असेल तर बुध नुसार कार्यकर्त्यांचे नियोजन झाले का ? असा प्रश्न निर्मित झाला . माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात  अखेर भाजपाने संगमनेर मधून विखे यांच्या ऐवजी अमोल खताळांना उमेदवारी दिली . तर शिर्डीतून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात कॉग्रेस कडून प्रभावती घोगरेना उमेदवारी देण्यात आली .
2009 ला मतदारसंघाची रचना झाली संगमनेरची 28 गांवे शिर्डीला जोडली गेली . शिर्डीची काही गांवे कोपरगांवात गेली , अकोलेची काही गांवे संगमनेरला जोडल्या गेल्याने . एकमेकावर एकमेकांची भिस्त उभी राहिली . आश्वीसह 28 गांवावर सुध्दा थोराताचा प्रभाव असल्याकारणाने 2009 च्या निवडणुकीत विखे – पिपाडाची जोरदार लढत झाली त्या लढतीत 28 गावांनीचं विखेंना तारले . आता पुन्हा तिचं परिस्थिती निर्माण झाल्याने संगमनेरमधून जरी थोराताविरोधात अमोल खताळ यांना उमेदवारी दिली मात्र त्यांचे सारथी हे डॉ विखे रहाणार असल्याने लढतीत रंगत येणार हे निश्चित तर शिर्डीतून विखेच्या विरोधात थोरातांनी प्रभावती घोगरे यांना कॉग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिली मात्र श्रीकृष्णाची भूमिका ही थोरातचं निभावरणार असल्याने ” सख्ये भाऊ पक्कै वैरीनुसार आजी – माजी महसूल मंत्र्यांना पाडण्यासाठी प्रयत्न होणार हे निश्चितचं झाल्याने या लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष्य लागणार आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed