राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील आशीर्वादनगर परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकानांचे शटर तोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
चोरट्यांनी इंडियन पोल्ट्री फॉर्म, भारत ॲग्रो आणि साई माऊली किराणा या तीन दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानांतील रोख रक्कम वर डल्ला मारला.एकाच रात्री सलग तीन दुकाने फोडल्याने लोणी परिसरात खळबळ उडाली आहे. चोरी केल्यानंतर चोरटे सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा व पुढील तपास लोणी पोलीस करत आहे. चोरीला गेलेल्या ऐवजाची नेमका किती होता हे तपासानंतर निदर्शनास येईल.