झरेकाठी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील साकूर गावात मागील दोन महिन्यापासून एका बिबट मादीचा तीच्या दोन बछड्यासह वावर आहे. अशी माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर व काल बुधवारी दिं. 5 ऑगस्ट रोजी सकाळीच बिबट्याने मानवी वस्तीत आल्याने नागरिकांत खळबळ उडाली होती. या बिबट्याचा व्हिडीओ जागृत नागरिकांनी काढून वनविभागाला पाठवला. यावेळी साकूर चा आठवडे बाजार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर वन विभागाने दखल घेत वनरक्षक शंकर खेमनर यांच्या पथकाने शोध मोहीम हाती घेऊन एक बिबट्या पकडण्यात यश मिळवले आहे. साकूर ग्रामस्थांनी यावेळी वनरक्षक शंकर खेमनर यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे.

या पथकाने अभ्यासपूर्ण बिबट्याचा माग काढला. ग्रामस्थांशी व प्रत्यक्षदर्शी यांच्याशी चर्चा करून त्याअनुषंगाने दोन पिंजरे परिसरात बसविण्यात आले होते. परिसराचे परीक्षण करून वनरक्षक शंकर खेमनर व त्यांच्या टीमने आपल्या अभ्यासू वृत्तीने अखेर एक बिबट्या पिंजऱ्यात अडकविण्यात यश मिळवले आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या मते येथे अजून एक मादी बिबट व आणखी एक बछडं आहे. एक बिबट्या पकडला आहे. पण आणखी दोन बिबटे असल्याने आमची भीती कायम आहे. परंतू वनरक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन केले आहे. तीन बिबटे या छोट्याश्या परिसरात राहू शकत नाहीत. हा परिसर छोटा आहे त्यामुळे येथे हा बिबट्या चुकून फसला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. तरीही आपण स्थानिकांच्या माहितीनुसार पिंजरा या ठिकाणावर कायम ठेवणार असल्याचे सांगितले.

 

.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *