{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान !

आश्वी । झुंझार न्यूज

केवळ कामावर निष्ठा आणि निस्वार्थी सेवाभाव जपल्यास त्याचे फळ निश्चित मिळते, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. सौ. जया विजय कांबळे यांची अंगणवाडी मदतनीस या पदावरून ‘अंगणवाडी सेविका’ या पदावर पदोन्नती करण्यात आली असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबीरात हा सन्मान करण्यात आला.संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते सौ. जया कांबळे यांना पदोन्नतीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सौ. जया कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी मदतनीस म्हणून आपले कर्तव्य अत्यंत चिकाटीने आणि समर्पित वृत्तीने पार पाडले आहे. त्यांच्या या सेवाभावाची दखल घेऊन प्रशासनाकडून त्यांना ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा क्षण कांबळे कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा ठरला आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *