{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी l झुंजार न्यूज

महायुतीचे उमेदवार ना. राधाकृष्ण विखे पाटील हे विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जात असून गावागावात विखे पाटलांच्या विकास कामांचा गवगवा सुरू असल्याचे चित्र दिसून आले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी व परिसरात विखे यांच्या प्रचार दौऱ्यात तरुणाईचं नव्हे तर महिला सुध्दा सहभागी झाल्याचे दिसून आले. तर लहान मुलांसह महिलांनी , तरुणांनी विखे पाटील बरोबर सेल्फी घेत ते विखे पाटील यांचे फॅन बनल्याचे दिसून आले .
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द , शिबलापूर , शेडगांव , कनोली , मनोली , उंबरी – बाळापूर , ओझर आदी परिसरातील गावात राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचारफेरी काढत प्रचार सभा घेतल्या तरुणांसह महिला , वयोवृध्दाशी संपर्क साधत त्यांची अस्थेनी चौकशी केली . तरुणांपासून ते वयोवृध्दापर्यंत सगळेच त्यांच्या पाठिशी असल्याचे चित्र दिसून आले. लाडकी बहिणी योजनेमुळे ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण करत आशिर्वाद दिले. आता पर्यंत झालेली विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर विखे पाटील यांनी मांडल्याने त्यांना भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 
यावेळी विखे पाटील यांच्या बरोबर जेष्ठ कार्यकर्त्यांनी परिसरात फिरुन एक आनंददायी वातावरण निर्माण केले आदीवाशी , मागसवर्गिय , ठाकर , धनगर आदी समाज्यातील कार्यकर्ते , तरुणाई मोठ्या प्रमाणात दिसून तर आलेचं मात्र लहान मुलासह मुली – महिलांनी , तरुणांनी त्यांच्याबरोबर सेल्फी आनंद घेतला एक ऑयडॉन पध्दतीने त्यांच्या आवती – भोवती गावोगावी गर्दी दिसून येत होती . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *