{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी l झुंजार न्यूज

सर्व समाज्याला बरोबर घेवून चालणारे बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व असून थोरातांनी आपुलकी व जिव्हाळ्याचे संबंध ठेवत सातत्याने विकासाचा ध्यास घेतला असल्याचे मत संगमनेर तालुका दूघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केले .  
महाविकास आघाडीचे तथा कॉग्रेसचे उमेदवार आ . बाळासाहेब यांच्या प्रचारानिमित्ताने तालुक्यातील अंभोरे, पिपंरणे, डिग्रस, मालुंजे, रायते ,वाघापूर, खराडी ,देवगाव जाखुरी येथील गावकऱ्यांशी रणजितसिंह देशमुख यांनी सुसंवाद साधत बुधनिहाय बैठका घेवून तालुक्याचा विकास व जडण घडण हे बाळासाहेब थोरातांनी निस्वार्थीपणातून केला असल्याचे देशमुखांनी सांगितले .
  
देशमुख पुढे म्हणाले की , “आपला माणूस” म्हणून तुम्ही नेहमी बाळासाहेब थोरांतावर भरपूर प्रेम केले या पुढेही हीच आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते कायम ठेवूया . विरोधक येतात आणि जातात मात्र वातावरण दूषित करतात त्याचा विकास व्हिजन हा केवळ बोलबाला असतो , बाळासाहेब थोरातांनी आपला विकास व्हिजन सातत्याने कृतीतून केल्याचा आजवरचा इतिहास आहे तेव्हा ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून आ. बाळासाहेब थोरातांचे हात बळकट करुन पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी करुन महाराष्ट्र राज्यात काम करण्याची संधी आपण द्यायची हि आपली सर्वाची मोठी जबाबदारी आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed