आश्वी l झुंजार न्यूज
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग आठव्यांदा आमदार म्हणून बहुमताने निवडून आणायचे आहे. विखे पाटील हे विकासाचे महामेरू आहेत. प्रवरा नदीला केटी वेअर च्या मध्यमातुन पाणी आडवण्यात आले या मुळे बारामहि जिरायत शेती ही पाण्याखाली आली तसेच लिफ्ट व कॉनलच्या मध्येमातुन आश्वी परीसरातील शेती ही १०० टक्के बागायत करण्याचे काम हे विखे परिवाराने केल्याचे प्रतिपादन मांची हील संस्थाने संस्थापक अँड शाळीग्राम होडगर यांनी केले.
शिर्डी मतदार संघातील आश्वी बु येथील अमरेश्वर मंदिरा मध्ये महायुतीचे उमेदवर भाजपचे जेष्ठ नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचार नारळ प्रसंगी अँड शाळीग्राम होडगर बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, बहुजन समाजाची उपजिविकेचे साधन शेती आहे. आशा शेतकऱ्यांना पहिल्यांदा शेतीला पाणी देऊन शेतकऱ्यांची च्या आर्थीक नियोजनासाठी मोठी मदत विखे पाटील यांनी केली. यामुळे परीसरामध्ये लहान सहान उद्योग धंदे तसेच व्यापार पेठ वाढण्यासाठी मोठी मदत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुळे झाली असल्याचे अँड शाळीग्राम होडगर यांनी सांगितले.
माजी सरपंच हरीभाऊ ताजणे यांनी सांगितले की,विखे परीवार हे ४० ते ५० वर्षापासुन वाड्या वस्तीच्या रस्त्याला मुरमी करण करत असतात.जर विखे परीवार हे मुरमी करन करत असेल तर त्यांवर तुम्ही खडी करण करून डाबरी रस्ता का करत नाही.केवळ विरोध करायचा म्हणुन विरोधक त्याच्या प्रचार सभे मध्ये मुरमी करणारा पाढा वाचत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात कुठलाही मुद्दा सापडत नसल्यामुळे विरोधाकाचे पोट दुखत आहे.
प्रवरा बँकेचे संचालक माधवराव गायकवाड म्हणाले की, विखे पाटील यांच्या विकास कामाची यादी कधी ही सपणार नाही. एका बाजुला विकासाचा डोगर आहे तर दुतऱ्या बाजुला भकास आहे. राजकारणा मध्ये विकास कामांना महत्व आहे व सामान्य जनता ही विकास कामे बघुन मतदान करत असते. त्यामुळे सर्वानी कमळ चिन्हा समोरील बदन दाबुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचडं मतानी विजय करायचे आहे.
मी ३० वर्षा मी माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर काम केले. पण पालथ्या घड्यावर पाणी घालत्यो त्या घड्यामध्ये एक थेंब ही पाणी जात नाही त्याप्रमाणे आश्वी परीसरातील विकास कामाना बगल देण्याचे काम हे थोरात यांच्या कडुन झाले असल्याचे प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीने महिलासाठी विविध योजना आणल्या यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महामंडळाच्या एस टी मध्ये महीलांना ५० टक्के प्रवास मध्ये सवलत, मेडीकल तसेच इंजिनेअरींग सारख्या महागड्या शिक्षणामध्ये मुलीं साठी १०० शिक्षण फी सवलत देत सावित्रीच्या लेकीनां स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली असल्याचे प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालिका अँड रोहीणीताई निघुते यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच हरीभाऊ ताजणे,प्रवरा बँकेचे संचालक माधवराव गायकवाड, संजय गांधी, प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड, अँड रोहीणी निघुते, ज्येष्ठ संचालक विनायक बालोटे,विजयराव चतुरे, हिंगे गुरूजी ग्रामपंचायत सदस्य सारिका जऱ्हाड, अनिस शेख प्राध्यापक कारभारी म्हसे आदींची भाषणे झाली.
यावेळी प्रवरा बँकेचे संचालक अजय ब्राम्हणे,सोसायटी चेअरमन आण्णासाहेब जऱ्हाड, माजी संचालक प्रभाकर निघुते, शाळीग्राम चंद, विजयराव म्हसे,अनिल कंगणकर,जानकिराम गायकवाड,अशोक जऱ्हाड,नवनाथ ताजणे, भिमा शिंदे भाऊसाहेब खेमनर, चंद शेख, व्यापारी सुशिल भंडारी, नामदेव होडगर, मंच्छिद्र ताजणे, बाबा गायकवाड, आदि उपस्थित होते. प्रचार नाराळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदम धोंडूभाई शेख हे होते. अध्यक्षपदाची सूचना वैभव ताजणे यांनी मांडली तर सुचनेस अनुमोदन प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड यांनी केले तर आभार हे अँड गौरव सांबरे यांनी मांडले.
