संगमनेर : प्रतिनिधी

तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते. विविध समाजाभिमुख उपक्रमाद्वारे विद्यार्थी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचत असतो. श्रमसंस्कार ही काळाची गरज आहे, हे ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने श्रमसंस्कार हे अंगिकारले पाहिजे. तरच भविष्यात आपला निभाव लागेल व समाज आपली विशेष दखल घेईल. संस्कारी पिढी व सर्वागीण विकास करण्याचे राष्ट्रीय सेवा योजना हे प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन डॉ. राम पवार यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर याठिकाणी आश्वी खुर्द येथिल कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे कँम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जेष्ठ नेते भगवानराव इलग होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक आण्णासाहेब भोसले, संचालक भाऊसाहेब जऱ्हाड, मा. पंचायत समिती सदंस्य निवृत्ती सांगळे, सरपंच दत्तात्रय आंधळे, गजानन आव्हाड, बाळासाहेब सांगळे, एकनाथराव सांगळे, जनार्दन डोंगरे, पांडुरंग आंधळे, सौ. शोभाताई आंधळे, सुकदेव आंधळे, पत्रकार योगेश रातडिया, संजय गायकवाड, रवींद्र बालोटे, राजेश गायकवाड, अनिल शेळके, ग्रामसेवक राशिनकर, शिक्षक दिघे तसेच महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर राम पवार, प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, कार्यक्रम अधिकारी अमित शिंदे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी समारोप समारंभाचे औचित्य साधून समाजात न्यायाची भुमिका घेऊन कार्यरत असलेल्या पत्रकारांचा सन्मान देखील यावेळी मान्यंवाराच्या हस्तें करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरापैकी जेष्ठ नेते अण्णासाहेब भोसले, भगवानराव इलग यानी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

पुढे बोलताना डॉ. पवार म्हणाले की, ‘Not Me, But You’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. तसेच समाजाला दिशा देणाऱ्या पत्रकाराचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देविदास दाभाडे यांनी केले. अलिशा सांगळे व कृष्णा पाटोळे या स्वयंसेवकानी मनोगत व्यक्त केले. शिबिराचे अहवाल वाचन प्रा. अमित शिंदे केले. सुत्रसंचलन प्रा. योगिता तळेकर, कु. ललिता ताजने यांनी केले. आभार प्रा. गणेश शेळके यांनी मानले असून शिबीर यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश शेळके, प्रा. निलेश पर्वत, प्रा. योगिता तळेकर, प्रा. नीतू मांढरे, प्रा. काजळ शिंदे यांचेसह रामदास ताजणे, संतोष त्रिभान आदिसह सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *