शिर्डी : प्रतिनिधी ‘त्या’ उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरातच घेतली पाहीजे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला
कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या घडामोडींबाबत निष्ठेचे धडे देणा-या बाळासाहेब थोरातांनीच आता ख-या अर्थाने खुलासा करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील तेव्हा त्या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरातच घेतली पाहीजे, असा टोला त्यांनी दिला. बीड येथील एका कार्यक्रमास जाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी विमानतळावर १० मिनिट थांबले होते. यादरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले .
