कर्जत l झुंजार न्यूज

 

 

 

 

 

कर्जत – जामखेड विधानसभांच्या महायुतीचे उमेदवार प्रा. रामदास शिंदे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. १२ नोव्हेबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शिव-पार्वती मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा व सभा होणार असल्याची माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमें यांनी दिली .
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा शिंगेला पोहचला असून मतदान वाढविण्याकरिता उमेदवारांची मोठी कसरत होत असून छोट्या – मोठया गटा – तटांना एकत्रित करण्याचे प्रयत्न होत असून महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना प्रचारार्थ निमंत्रीत करण्यात येताना दिसत आहे . कर्जत – जामखेड विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दलित समाज असून दलित समाज व्यतिरिक्त इतर समाजातील कार्यकर्ता रिपाईशी जोडला गेल्याने रिपाईच्या हक्काचे असणारे मतदान हे  महायुतीचे उमेदवार प्रा . राम शिंदे यांना मिळावे म्हणून केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा व सभेचे आयोजन मंगळवार दि १२ नोव्हेबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कर्जत येथील शिव पार्वती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास उमेदवार प्रा. राम शिंदे , रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , सुनिल साळवे , संजय भैलुमे , दत्ता कदम , विशाल काकडे यांच्यासह महायुतीतील पदाधिकाऱ्यांसह . दलित समाज्यातील कार्यकर्त उपस्थित राहणार आहेत .
तरी होणाऱ्या मेळाव्यास मोठ्या संख्येने पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंकुश भैलुमें यांनी केले आहे
.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *