{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

कर्जत l झुंजार न्यूज

नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील देशामध्ये मोठया प्रमाणात विकासात्मक कामे होत असून विविध योजनेच्या माध्यमातून २५ कोटी गोर गरिब माणसाचे जीवनमान विकास प्रवाहात आणल्यानेचं विकासच्या मुदयावर आमचा रिपब्लिकन पक्ष हा महायुतीत सामिल झालेला आहे महायुतीकडे विकासा मुद्दा तर विरोधकांकडे केवळ संविधान बदलण्याची अपप्रचार असल्याने समाज्याने व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराबरोबरचं रहावे असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले . 
कर्जत – जामखेड विधानसभेचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ ना. रामदास आठवले हे कर्जत मध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी बोलत होते .

यावेळी महायुतीचे उमेदवार प्रा राम शिंदे , माजी खासदार अमर सांबळे , प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमें , संजय भैलुमें , राष्ट्रवादी महिला आघाडी राज्य नेत्या ॲड संध्याताई सोनवणे , अंबादास पिसाळ , प्रविण घुले , दत्ता कदम , विशाल काकडे आदीसह रिपाई , भाजपा , राष्ट्रवादी , शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व दलित समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

 

 

यावेळी ना. रामदास आठवले यांनी आपल्या शेरो शायरी भाषणातून विरोधी उमेदवारांची विकेट घेत बाहेरील पार्सल हे नक्कीचं बाहेर जाणार व प्राध्यापक शिंदे हे आमदार होवून मंत्री होणार शिदे हे तळागाळातील व संघर्षातून निर्माण झालेला कार्यकर्ता होय . कॉग्रेस व त्यांच्या मित्र पक्षाने गोर गरिब , आदीवाशी , मागसवर्गिय , मुस्लीम , शेतकऱ्याच्या विकास करण्या ऐवजी केवळ भूल -भूलैया प्रकार केला . राहूल गांधी तर परदेशात जाऊन संविधान बदलण्याची भाषा करतात बाबासाहेबांचे संविधान हे कोणीचं बदलू शकत नाही असे आवाहन करत आठवले पुढे म्हणाले की , संपूर्ण राज्यातील रिपब्लिकन पक्ष हा महायुतीमागे भक्कम असून राम शिंदे सारख्या सर्वसामान्य माणसाच्या मागे उभे राहून येणाऱ्या २० नोव्हेंबरला आपला मताचा हक्क बजावून त्यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन केले .
प्रा. राम शिंदे म्हणाले की , मी ही तुमच्या सारखा चळवळीतील कार्यकर्ता असून माझे वडील होते . आपल्या समोर मोठयाचं लेकरु असून बाहेरचा आहे आपल्या हक्का विकास हा सुध्दा बाहेरचं पाठवला जातो तेव्हा जागे व्हा ! बाहेरील पार्सल बाहेरचं पाठवू व विकासाला साथ देवू !
विजय वाकचौरे म्हणाले की , रिपब्लिकन पक्षाची चळवळ ही गावो गावी पोहचली असून ही कार्यकर्त्याला कुठली ही अपेक्षा नाही केवळ रामदास आठवले यांना मंत्री पद मिळाले तरी आम्हाला व समाज्याला समाधान वाटते , भिमशक्ती व शिवशक्ती प्रयोगामुळे घटना बदलण्याचा विरोधकांकडून अपप्रचार होताना दिसत आहे याकरिता  देशात मोदी यांचेचं नेतृत्व पाहिजेल प्रत्येकांला न्याय देण्याचे काम मोदीनी केले आहे , तर राम शिंदे हे वैचारिक कार्यकर्ता असल्याने बारा बलुतेदार , आदीवाशी , मागसवर्गिय समाज तुमच्या पाठीशी आहे . 
श्रीकांत भालेराव म्हणाले की , संविधान खतरे मै है असे विरोधकांकडून वारंवार सांगितले जात आहे . ” जब तब चाँद रहेंगा , तब तक बाबासाहब का संविधान रहेंगा ” संविधानामुळे सर्व सामान्यांना सुध्दा काम करण्याची संधी मिळाली हे केवळ संविधानाच्या ताकतीमुळे , संविधानात बदल होणार नाही ही निर्वळ अफवा आहे .
यावेळी ॲड संध्या सोनवणे , प्रविण घुले , सुनिल साळवे यांची भाषणे झाली .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *