श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मा.श्री.बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्ट चे परिक्रमा शैक्षणिक संकुलातील परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे, येथील शिक्षणाचा दर्जा, उत्कृष्ठ वसतिगृह तसेच इतर असणाऱ्या सुविधा त्यामुळे महाराष्ट्रातून विद्यार्थी विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत, त्यातच या महाविद्यालयातील विद्यार्थिनींची एजिओ फार्मा.भोसरी, पुणे. या नामांकित कंपनीमध्ये मुलाखतीद्वारे 27 विद्यार्थिनींची व एमक्योर फार्मास्युटिकल्स पुणे.या कंपनी मध्ये 22 विद्यार्थ्यांची असे एकूण 49 विद्यार्थ्यांची निवड झाली असून ही संस्था व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची व ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. आणि महाविद्यालयाची यशोगाथा कायम राखली आहे. विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. हे यश संस्थेच्या दर्जेदार शिक्षण पद्धतीचे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे द्योतक आहे.
परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की दर्जेदार शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात.
येणाऱ्या काळात उत्कृष्ट आधुनिक लॅब, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज असे मैदान याप्रमाणे जास्तीत जास्त सुविधासह विद्यार्थी सर्वगुण संपन्न कसा होईल याकडे नेहमी संस्थेचे मुख कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते हे नेहमीच प्रयत्नशील असतात.
या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ.सोनल सोलंकी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांचे कौतुक होत आहे.