नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती
आश्वी । झुंझार न्यूज
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक परिवारात दीर्घकाळ आपली सेवा देणारे, प्रवरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरवंडीचे कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री. नानासाहेब देवराम पा. तळेकर यांचा ‘सेवापूर्ती कृतज्ञता’ सोहळा येत्या रविवारी, दिनांक २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या बहुमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. .
हा कृतज्ञता सोहळा रविवार, दि. २१/०६/२०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता आश्वी बुद्रुक येथील ‘साई लॉन्स मंगल कार्यालय’ (इरिगेशन बंगला जवळ, ता. संगमनेर) येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे शुभहस्ते पूजन व सत्कार माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहिल्यानगर, मा. सौ. शालिनीताई राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार श्री. राधाकृष्णजी विखे पाटील, माजी खासदार व प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. सुजयदादा राधाकृष्णजी विखे पाटील, संगमनेर विधानसभेचे आमदार मा. श्री. अमोलजी खताळ पाटील आणि रामेश्वर देवस्थान वरवंडीचे मठाधिपती ह.भ.प. दत्तगिरीजी महाराज लाभणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. आण्णासाहेब भोसले पाटील भूषवणार आहेत.
प्राचार्य नानासाहेब तळेकर यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरवंडी विद्यालयाने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या निवृत्तीनिमित्त समस्त तळेकर पाटील परिवार, पानोडी ग्रामस्थ आणि प्रवरा मित्र परिवाराने या कृतज्ञता सोहळ्याचे नियोजन केले आहे.



