नील स्वररत्न संस्थेच्या कलाकारांना रसिकांची दाद!

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

संगीताच्या दुनियेत गायकाला नेहमीच केंद्रस्थानी मानले जाते.मात्र गाण्याला अर्थपूर्ण आणि तितकेच भावनाप्रधान बनविण्यात वाद्यांची भूमिका किती महत्वाची असते याचा प्रत्यय देणारा “नात वाद्यांशी”हा अतियश वेगळा कार्यक्रम आयोजित करून नील स्वररत्न संस्थेच्या कलाकारांनी रसिकांची दाद मिळवली.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ गाणी सादर करणे नव्हे तर प्रत्येक गाण्यामागे वाद्यांची केलेली निवड आणि वाद्यांचा गायकांवर, गाण्यावर आणि रसिकांवर कसा सकारत्मक परिणाम होतो याच्या माहीतीसह नील स्वररत्न संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेली विविध गाणी कार्यकर्माचे वेगळेपण ठरले.

नील स्वररत्न संस्थेच्या प्रमुख गायिका सौ.निलांबरी कोर्टीकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाण्याला वाद्याची साथ देवून गाण अधिक भावना प्रधान कस करता येत याच प्रात्यक्षिकच नील स्वररत्न संस्थेतील सर्व गायकांनी सुरेल मैफलीतून सादर केले.

नील स्वररत्न संस्थेच्या माध्यमातून नवोदीत गायक वादक कलाकारांना कला सादर करण्याचे प्रोत्साहन दिले जाते.मासिक संगीत सभेची परंपरा यासाठी सुरू करण्यात आली आहे.आजपर्यत संस्थेने विविध संकल्पना घेवून अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण करून संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपले वेगळेपण जपले आहे.प्रत्येक गाण्यात वापरण्यात आलेले वाद्य त्याचे महत्व आणि गाण्यातील प्रत्येक शब्दाला वाद्यांच्या साथीने मिळालेला अर्थपूर्ण भाव याचे अभ्यासपूर्ण विवेचन सौ.निलांबरी कोर्टीकर यांनी केले.

संगीत क्षेत्राकडे पाहाण्याचा नवा दृष्टिकोन “नात वाद्यांशी” कार्यक्रमातून पाहायला मिळाला निल स्वररत्न संस्थेच्या सर्व गायक कलाकारांनी सादर केलेली गाणी रसिकांची दाद मिळवून गेली.सर्व गायक कलाकारांना सिंथेसायझरवर सत्यजीत सराफ,तबला ढोलक ढोलकीवर वैभव पवार आणि अॅक्टोपॅडवर गणेश गोर्डे यांनी साथसंगीत केली.कार्यक्रमास शहरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *