आश्वी । झुंझार न्यूज

जिद्द, चिकाटी आणि अखंड परिश्रमांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही यशाची उत्तुंग शिखरे सर करू शकतात, हे संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील कल्पेश मच्छिंद्र पवार यांनी सिद्ध केले आहे. कल्पेश यांची मुंबई महानगरपालिकेमध्ये (BMC) ‘एक्झिक्युटिव्ह असिस्टंट’ (Executive Assistant) या प्रतिष्ठित सरकारी पदावर निवड झाली आहे . 

कल्पेश पवार यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे यश संपादन केले आहे. कोणत्याही मोठ्या यशामागे प्रचंड कष्ट आणि आत्मविश्वास असतो, हेच कल्पेश यांनी आपल्या निवडीतून दाखवून दिले. ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या मोठ्या महानगरात शासकीय सेवेत मानाचे स्थान मिळवल्याबद्दल त्यांच्या कुटुंबाचे, गावाचे आणि समाजाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे निळवंडे गावातील इतर विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ही निवड अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.


कल्पेश पवार यांच्या निवडीचे वृत्त समजताच निळवंडे गावचे ग्रामपंचायत सदस्य विकास चांगदेव पवार, सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिरडे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर रामभाऊ पवार, भाऊसाहेब रामनाथ पवार, सुदाम सोपान उकिरडे, शशिकांत सुभाष पवार, विनोद अरुण पवार, उत्तम गणपत पवार, सुभाष तानाजी उकिरडे, रायभान नारायण पवार, पोपट रामभाऊ पवार, पोपट दामू पवार, साहेबराव लक्ष्मण पवार, गंगाधर बाबुराव पवार, गंगाधर विठ्ठल पवार, दत्तात्रय सयराम पवार, भाऊसाहेब सूर्यभान पवार, भाऊसाहेब सहादू वारे, बाळासाहेब पंढरीनाथ पवार, सतीश अण्णासाहेब पवार, सुभाष शिवनाथ पवार, रावसाहेब सहादू वारे, मच्छिंद्र सिताराम पवार, रावसाहेब आप्पाजी पवार, प्रकाश पंढरीनाथ पवार, भागवत आहेर, संदीप माधव पवार, दत्तू बाजीराव पवार आदीसह ग्रामस्थांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *