नेवासा । झुंजार न्यूज
नेवासा विधानसभाचे उमेदवार विठ्ठल लंघे यांच्या प्रचारार्थ झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत स्टेजपासून ते सभा परिसरात झळकणाऱ्या बॅनरवर रिपब्लिकन नेते तथा केद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांचे एक ही फोटो व निळे झेंडे नसल्याने रिपाई विजय वाकचौरे , श्रीकांत भालेराव या जेष्ठ नेत्यासह कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त करत व घोषना बाजी देत मुख्यमंत्र्यांच्या सभेवर बहिष्कार टाकला .
महायुतीचे उमेदवार विठ्ठल लंघेच्या प्रचारार्थ नेवासा फाटा येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे , पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सर्व पक्षीय जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते . महायुती मधील घटक पक्ष असणाऱ्या केद्रीयमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाई पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्यासह रिपाईचे हजारों कार्यकर्ते सभेकरिता सभास्थळी दाखल झाले मात्र महायुतीत सहयोगी असणाऱ्या सर्व पक्षाच्या प्रमुखांचे फोटो बॅनरवर दिले मात्र रिपाई पक्षाचे प्रमुख ना. रामदास आठवले यांच्या कोठे फोटो अथवा निळे झेंडे आढळून न आल्याने पक्षाच्या वरिष्ठांसह कार्यकर्त्यांना ही गोष्टी खटकल्याने कार्यकर्त्यांनी आठवले यांच्या घोषणा करत मुख्यमंत्र्यांच्या सभेवरचं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत कार्यकर्त्यांनी सभास्थळ सोडले .
यावेळी विजय वाकचौरे व श्रीकांत भालेराव यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त करत महायुतीच्या लोकांना रिपाईचे व दलिताचे मते चालतात मात्र फोटो चालत नाही संपूर्ण राज्यात रामदास आठवले यांना मताकरिता आंमत्रित करतात मात्र त्यांचा फोटो लावण्यात लाज वाटते की काय ? असा प्रश्न यांनी उपस्थित करत नेवासा येथील घडलेला प्रकार केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले .

