आश्वी l झुंजार न्यूज

 

 

 

राहात्या तालुक्यातील १ रूपये पिक विमा योजनेसाठी १ कोटी रूपये चा शेतकऱ्यांना लाभ झाला.यामध्ये शिर्डी मतदार संघातील संगमनेर तालुक्यासाठी जवळ पास २१ कोटी हून अधिक निधी मिळाला. आडीच वर्ष महायुती सरकारला असुन सरकार आल्यावर मुख्य़मंत्री लाडकी बहिन योजनेसाठी १५०० रूपये ऐवजी २१०० रूपये दर महा महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परीषद अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांनी केले.

 

 

 

 

 

 

शिर्डी मतदार संघातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथे शालीनीताई विखे पाटील बोलत होत्या.यावेळी प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या संचालिका सुवर्णाताई विखे पाटील, मोनिका विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सी ई ओ सुषमिता विखे पाटील, कारखान्याचे माजी संचालक विजयराव चतुरे,विनायक बालोटे प्रवरा बँकेचे संचालक माधवराव गायकवाड,संजय गांधी, अजय ब्राम्हणे, भाऊसाहेब जऱ्हाड, अँड रोहीणी निघुते, माजी सरपंच हरीभाऊ ताजणे, नानासाहेब डोईफोडे, सुमतीलाल गांधी,पंकज नाके,मिंलिंद बोरा आदि ची भाषणे झाली.

 

 

 

 

 

 

पुढे बोलतांना विखे पाटील म्हणाल्या की,राहात्या तालुक्यामध्ये ४० हजार महिला बचत गटाचे संघटन असुन संगमनेर तालुक्यातील २६ गावामध्ये १५ हजाराहून अधिक महिलाचे बचत गटामध्ये जोडल्या गेल्या आहे. नुकताच महिलाना मुख्यमंत्री लाडक्या बहिनासाठी जवळ पास ७ हजार ६०० रूपये मिळाले, दिवाळी मध्ये बचत गटातील महिलांना मिळालेल्या पैशाचे सदुपयोग करत त्यातुन बचत गटा मार्फत दिवाळी फराळाची तयार करून लाखो रूपये केल्याचे शालीनीताई विखे यांनी सांगितले

 

 

 

 

 

 

यावेळी सरुनाथ उंबरकर, विजयराव म्हसे,य़ोगेश रातडीया, वैभव ताजणे, ग्रामपंचायत सदस्या सारीका जऱ्हाड, मिना गायकवाड, भाऊसाहेब खेमनर, अनिल कंगणकर, विनायकराव जऱ्हाड, सचिन ताजणे, अभिजीत म्हसे, संजय गायकवाड, अशिष जाधव, भिमा शिंदे,मंगेश गायकवाड, अनिल म्हसे, सुभाष होडगर, नितीन शिंदे, अभिजीत गांधी,अशोक जऱ्हाड, बाबा गायकवाड, राजेद्र होडगर यासह महिला, तरूण तसेच भाजप कार्यकते उपस्थित होते.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *