{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

लोणी l झुंजार न्यूज

 

 

 

शिर्डी ही साईबाबांची तर, प्रवरेची भूमी ही गोरगरीबांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा देणारी भूमी आहे. या भूमीला दशहतवादी आणि आतंकवादी म्‍हणून अपमानीत करण्‍याचा प्रयत्‍न महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी केलेला प्रयत्‍न शिर्डीच्‍या जनतेचा स्‍वाभिमान दुखावणारा असून, अशा प्रवृत्‍तींना जनतेने मतदानातून हद्दपार करावे असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

 

 

 

 

विधानसभा निवडणूकीच्‍या प्रचाराची सांगता सभा लोणी बुद्रूक येथे केंद्रीय सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री ना.रामदास आठवले, विधान परिषदेचे गटनेते आ.प्रविण दरेकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाली. या सभेत मंत्री विखे पाटील यांनी पुन्‍हा महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांवर निषाणा साधून त्‍यांच्‍या दशहतवादाच्‍या आरोपाला चोख उत्‍तर दिले.

 

 

 

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मागच्‍या पंधरा दिवसात फक्‍त शिर्डी विधानसभा मतदार संघाला फक्‍त बदनाम करण्‍याचे प्रयत्‍न झाले. येथील जनतेच्‍या भावनांना ठेच पोहोचविली गेली. पण आम्‍ही लोकांसाठी काम करतो. ही भूमी श्री.साईबाबांची आहे. देश विदेशातून लाखो भाविक येतात. प्रवरा परिसरात येवून लाखो विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले. प्रवरा ग्रामीण रुग्‍णालयातून आरोग्‍य सुविधा मिळत आहेत. मग ही तुम्‍हाला दशहत वाटते का? शिर्डीमध्‍ये युवकांच्‍या रोजगारासाठी औद्योगिक वसाहत आणली मग ही सुध्‍दा तुम्‍हाला दशहत वाटते का, येथील सहकार चळवळ ही तुम्‍हाला दशहती सारखे वाटते का असे प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित करुन, आमची दशहत ही विकासाची असल्‍याचे ठामपणे सांगितले.

 

 

 

 

संगमनेर तालुक्‍यातील जनतेला कोणता विकास तुम्‍ही दिला असा प्रश्न उपस्थित करुन तालुक्‍यातील गावे तुम्‍ही तहानलेली ठेवली आहे. तीस हजार युवकांना रोजगार दिल्‍याचा खोटा दावा करता, मी तुमच्‍या संस्‍थावर कधी बोलणार नव्‍हतो, पण अमृतवाहीनी बॅकेंच्‍या ठेवी आज कमी होत चालल्‍या आहेत. दूध संघावरही कर्ज वाढले आहे. अनेक गोष्‍टींचा त्‍यांना सोयीस्कर विसर पडतो, संगमनेर कारखान्‍याचे संस्‍थापक पद्मश्री विखे पाटील होते, बी.जे. खताळ पाटील, दत्‍ता देशमुख, भास्‍करराव दुर्वे या जेष्‍ठ नेत्‍यांनी त्‍यांना साथ दिली. पण त्‍यांच्‍या कारखान्‍याला ऊस नव्‍हता पण आपल्‍या आश्‍वी गट नं.१ मधून पद्मश्रींनी ऊस दाखवून तो कारखाना सुरु करुन त्‍यांच्‍या ताब्‍यात दिला. पण संस्‍थापकांचीही त्‍यांना आठवण राहीली नाही ते जनतेचीही काय आठवण ठेवणार.

 

 

बाहेरच्‍यांच्‍या कुबड्या घेवून येथे यापुर्वीही राजकारण केले गेले. मात्र कर्तृत्‍व शुन्‍य लोकांना शिर्डीची जनता थारा देत नाही असा इशारा देवून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, केवळ निंदा नालस्‍ती, व्‍यक्तिव्‍देशाची भाषण करुन या भागातील लोकांच्‍या भावनेला हात घातला गेला. यापुर्वीही असे राजकीय हल्‍ले अनेक झाले पण आमची स्‍वाभिमानी जनता ठामपणे अशा प्रवृत्‍तींच्‍या विरोधात उभी राहीली.

 

 

यंदाच्‍या निवडणूकीतही पंधरा दिवस फक्‍त हीच परिस्थिती होती. कारण ज्‍यांना बोलायला लावले त्‍यांना कुबड्या दुस-याच्‍या आहेत आणि त्‍यांना सल्‍ले देणारे तिसरे आहेत, यांचा विकासाशी कुठलाही सं‍बध नसल्‍याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.

 

 

 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्‍हणाले की, बाळासाहेब विखे पाटील यांचे गाव आहे लोणी त्‍यामुळे राधाकृष्‍ण विखेंना हरविणार कोणी अशी कोटी करुन, या भागातील जनतेने ना.विखे पाटील यांना सात वेळा निवडून दिले आहे. त्‍यांची विकास कामे करण्‍याची पध्‍दतही चांगली आहे. यंदाच्‍या विधानसभा निवडणूकीतही या भागातील जनता त्‍यांच्‍या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन, देश मोदींच्‍या नेर्तृत्‍वाखाली पुढे जात आहे. संविधान आणि आरक्षणाला कोणताही धोका नाही, राहुल गांधी फक्‍त बोलण्‍यात हूषार आहेत असा टोला त्‍यांनी लगावला.

 

 

विधानपरिषदेचे गटनेते आ.प्रविण दरेकर म्‍हणाले की, राज्‍यातील जनतेने महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचा निर्धार केला आहे. युती सरकारने सुरु केलेल्‍या लाडक्‍या बहीण योजनेला नख लावण्‍याचा प्रयत्‍न महाविकास आघाडीने केल्‍याचा आरोप करुन, मंत्री विखे पाटील यांनी मंत्री पदाच्‍या माध्‍यमातून सामाजिक निर्णय घेवून, चांगले काम केले असल्‍याने त्‍यांना पुन्‍हा मोठी संधी मिळावी म्‍हणून विधानसभेत निवडून पाठविण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *