श्रीगोंदा

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मध्ये भाजप उमेदवार विक्रम पाचपुते अपक्ष उमेदवार राहुल जगताप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या मध्येच खरी लढत असल्याची मतदार संघात चर्चा आहे. परंतु आमदार बबनराव पाचपुते यांनी गेली चाळीस वर्षे तालुक्यात सत्ता उपभोगली तर राहुल जगताप यांनी आमदार म्हणून पाच वर्षे काम केले. या दोघांनी मिळून तालुक्यात काही भरीव कामे करण्याऐवजी स्वता:ची आर्थिक संपत्ती वाढविल्यामुळे तालुक्यातील सुज्ञ मतदार श्रीगोंदा विधानसभा निवडणूकीत एकमेव महिला उमेदवार म्हणून महाविकास आघाडी शिवसेनेच्या अनुराधा नागवडे उभ्या असल्याने त्यांचे पाचपुते व जगताप यांच्यापेक्षा अनुराधा नागवडे यांनाच मतदारांची सहानुभूती मिळत आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी कि गेल्या चाळी वर्षापासून आ. बबनराव पाचपुते यांनी १९९० पासून ते २०२४ पर्यंत स्वंताच्या स्वार्थासाठी विविध पक्ष बदलून अनेक पदे भोगली परंतु यामध्ये त्यांनी सुरुवातीस श्रीगोंदा शहराजवळ औटेवाडी येथे तालुक्यातील गोरगरीब महिलांचे कुकुट पालनासाठी लाखो रुपयांचे शेअर्स जमा करुण शासनाचे अनुदान लाटले. कोंबड्या, अंडी खावून टाकले. तर याच ठिकाणी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी एम.आय.डी. करतो म्हणून सांगितले. आणि काष्टी येथे स्वांताची दूध डेअरी काढून तालिम बांधली. दूधावरची मलई खावून बंद केलि. तद्नंतर देवदैठण येथे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पाच हजारापासून ते पाच लाखापर्यंत शेअर्स गोळा करुण साखर कारखाना उभा केला. यानंतर थोड्या दिवसात हिरडगाव येथेहि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये भागभांडवल जमा करुण दुसरा स्वतःचा खाजगी साखर कारखाना उभा केला. हे दोन्ही कारखाने चालविता न आल्याने बंद पडले. याचे कारण म्हणजे तालुक्यातील कुकडी डावा कालव्याचे काम व भोसा खिंडिचे काम तसेच घोडधरणाचि उंची वाढविणार, विसापूर धरणाचि उंची वाढविणार, नगर तालुक्यात एम. आय. डिसि करणार सह तालुक्यातील रस्ते, विज, पाणी हे सर्व प्रश्न सोडवून श्रीगोंदा तालुक्याची बारामती करणार असे अनेक खोटे आश्वासन देवून मतदार संघातील जनतेला भूलवत ठेवून स्वातांच्या शिक्षण संस्था उभ्या करुण अलिशान हवेली बांधून निवांत झाले. 
आता स्वता:च्या मुलाला विधानसभा निवडणुकीत उभे करुण सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करित आहेत. पण तालुक्यातील मतदार जनता यांना थारा देणार नाही. तर दुसरे अपक्ष उमेदवार माजी आमदार, कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप हे २०१४ साली स्व. शिवाजीबापु नागवडे, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, स्व. तुकाराम दरेकर, यांच्यासह अनेकांच्या कृपेने आमदार झाले. पण हे आमदार होताच तालुक्यातील विज, पाणी, रस्ते या जनतेच्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करुण स्वातांच्या स्थावर जंगम मालमत्ता कशी वाढेल याकडे आमदारकी व कारखान्याच्या माध्यमातून जास्त लक्ष दिले. पुणे, पारनेर, अहिल्यानगर, येथे देशि विदेशी (वाईन शॉप) नातेवाईकांच्या नावे घेऊन दुकाने टाकले. 
तर गोवा, महाबळेश्वर, येथे कोट्यवधी रुपये खर्च करुण अलिशान हॉटेले टाकले. तर कुकडी कारखाना परिसरात कोट्यावधी रुपयाची शेकडो एकर जमीनि घेतल्याने कुकडी साखर कारखाना कर्जबाजारी करुण डबघाईला आणला आणि बंद पाडला. अशा या उद्योगाने मतदार संघातील जनता पाचपुते व जगताप यांच्यावर नाराज असल्याने स्व. शिवाजीबापु नागवडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी उभे केलेल्या नागवडे साखर कारखाना, तालुका दूध संघ, तालुका देखरेख संघ, विविध सहकारी संस्था, जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा, यासह राज्यात एकमेव असणारी नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची सभासद, कामगार, शेतकरी यांच्या मुलामुलींना उच्चशिक्षणासाठी पहिले इंजिनिअरिंग कॉलेज काढून कारखान्याच्या माध्यमातून छत्रपती महाविद्यालय सह गावोगावी हायस्कूल उभे केले. कारखान्यावर जास्त भार येवू नये म्हणून ज्ञानदिप शिक्षण संस्था काढून तरुणांना सुशिक्षित करुण रोजगार उपलब्ध करुण दिले. कोरोना काळात नागवडेंनी मोठी मदत केली. 
हे भरिव काम जनता विसरणार नाही. त्यामुळे पाचपुते व जगताप यांच्यावर मतदार नाराज होवून तिसरा पर्याय म्हणून अनुराधा नागवडे यांच्या बद्दल सहानुभूती तयार झाल्याने नागवडे यांचे तालुक्यात पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *