आश्वी l झुंजार न्यूज

देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मजबूतीमधून पुढे चालला असून सर्वसामान्यसह शेतकरी , कष्टकरी , दीन दलितांचे प्रश्न मार्गी लागत आहे तसेचं राज्याचे नेतृत्वसुध्दा लाडकी बहीण योजनेसह विविध योजनेच्या माध्यमातून लोकांचा सर्वांगीण विकास कमान हाती घेतल्याने भविष्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सारखा मजबूत व अनुभवी नेता राज्याला हवा असल्याने शिर्डीकरांनी त्यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले .
विधानसभा निवडणूकीच्‍या प्रचाराची सांगता सभा लोणी बुद्रूक येथे उमेदवार महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , विधान परिषदेचे गटनेते आ.प्रविण दरेकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाली. या सभेत मंत्री आठवले यांनी आपल्या शेरोशायरीतून महायुतीच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांची स्तूती केली .
केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले की , कै . बाळासाहेब विखे पाटील यांचे आम्हाला नेहमी सहकार्य राहिले संसदमध्ये काम करताना त्यांनी सातत्याने दलित , आदीवाशी , कष्टकरी , शेतकऱ्यांच्या विकासाचे ध्येय धोरण मांडण्यासाठी आमच्यासह पुढाकार घेतला दलित पँथर संघटनेला त्यांचे मोठे सहकार्य राहिल्याचे आठवणी आठवले यांनी काढले . तर राधाकृष्ण विखे पाटील हे आठव्यांदा निवडून येणार असा विश्वास व्यक्त करत ” आठ हा आंकडा आहे शुभ म्हणून आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी ” म्हणत अनेक शेरो शायरीतून मतदारांना हसविले .
 बाळासाहेब विखे पाटील यांचे गाव आहे लोणी त्‍यामुळे राधाकृष्‍ण विखेंना हरविणार कोणी अशी कोटी करुन, या भागातील जनतेने ना.विखे पाटील यांना सात वेळा निवडून दिले आहे. त्‍यांची विकास कामे करण्‍याची पध्‍दतही चांगली आहे. यंदाच्‍या  विधानसभा निवडणूकीतही या भागातील जनता त्‍यांच्‍या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन, देश मोदींच्‍या  नेर्तृत्‍वाखाली पुढे जात आहे. संविधान आणि आरक्षणाला कोणताही धोका नाही, राहुल गांधी फक्‍त बोलतात .
       
आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मागच्‍या पंधरा दिवसात फक्‍त शिर्डी विधानसभा मतदार संघाला फक्‍त बदनाम करण्‍याचे प्रयत्‍न झाले. येथील जनतेच्‍या भावनांना ठेच पोहोचविली गेली. पण आम्‍ही  लोकांसाठी काम करतो. ही भूमी श्री.साईबाबांची आहे. देश विदेशातून लाखो भाविक येतात. प्रवरा परिसरात येवून लाखो विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले. प्रवरा ग्रामीण रुग्‍णालयातून आरोग्‍य सुविधा मिळत आहेत. मग ही तुम्‍हाला दशहत वाटते का? शिर्डीमध्‍ये युवकांच्‍या रोजगारासाठी औद्योगिक वसाहत आणली मग ही सुध्‍दा तुम्‍हाला दशहत वाटते का, येथील सहकार चळवळ ही तुम्‍हाला दशहती सारखे वाटते का असे प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित करुन, आमची दशहत ही विकासाची असल्‍याचे ठामपणे सांगितले 
      
 बाहेरच्‍यांच्‍या कुबड्या घेवून येथे यापुर्वीही राजकारण केले गेले. मात्र कर्तृत्‍व शुन्‍य लोकांना शिर्डीची जनता थारा देत नाही असा इशारा देवून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, केवळ निंदा नालस्‍ती, व्‍यक्तिव्‍देशाची भाषण करुन या भागातील लोकांच्‍या भावनेला हात घातला गेला. यापुर्वीही असे राजकीय हल्‍ले अनेक झाले पण आमची स्‍वाभिमानी जनता ठामपणे अशा प्रवृत्‍तींच्‍या  विरोधात उभी राहीली.
यंदाच्‍या निवडणूकीतही पंधरा दिवस फक्‍त हीच परिस्थिती होती. कारण ज्‍यांना बोलायला लावले त्‍यांना कुबड्या दुस-याच्‍या आहेत आणि त्‍यांना सल्‍ले देणारे तिसरे आहेत, यांचा विकासाशी कुठलाही सं‍बध नसल्‍याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *