◻️ मंत्री विखे यांच्या प्रयत्नातून मंदिर जिर्णोद्धारासाठी २० लाखाचा निधी
आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक प्रभु श्रीराम, श्री दत्त आणि पुंजाआई माता मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे नुकतेच या मंदिर जिर्णोद्धाराचे बांधकाम सुरु झाले असुन सध्या ते प्रगतीपथावर आहे
आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक असे प्रभु श्रीराम, श्री दत्त आणि पुंजाआई माता मंदिर मोडकळीस आले होते. त्यामुळे गावातील जेष्ठ कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुणांनी एकत्र येऊन याबाबत मंत्री विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील व सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्याकडे निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रह धरला होता. विखे पाटील कुटुंबाचे आश्वी खुर्द गावावर विशेष प्रेम असल्याने मंत्री विखे पाटील यांनी मंदिर जिर्णोद्धार करण्यासाठी २० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला.
विधान सभेच्या निवडणुकीच्या धामधुमीतही मंदिर बांधकाम सुरु होते सध्या काम अतिशय उत्तमरित्या सुरु असुन कामाचा पहिला टप्पा संपत आला असुन प्लिंत लेव्हलच्या कामाचे पूजन मान्यवररांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक ॲड.अनिल भोसले दुध संस्थेचे चेअरमन मकरंद गुणे व्यापारी विलासशेठ भंडारी गणपत सातपुते संजय गायकवाड संतोष भडकवाड शरद सोनवणे विनायक क्षिरसागर कृष्णा कहार जयललित तक्ते सचिन बोरुडे ओम भडकवाड संपत सातपुते भारत भडकवाड संजय भडकवाड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावचे ग्रामदैवत श्रीप्रभु राम श्री दत्त प.पु.पुंजाआई माता संयुक्त मंदिराचा जिर्णाध्दार होत असुन मंदिरास अंदाजे ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित असुन नामरार राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० लाख रुपये निधी दिला असुन गावच्या वर्गणीतुन हे मंदिर पुर्णत्वास जाणार असुन ग्रामस्थ भाविकांनी वर्गणी जमा करावी
ॲड.अनिल भोसले
