आश्वी | झुंजार न्यूज

 

 

 

महायुतीचे शिर्डी विधानसभा मतदार संघातील महायुतीतील मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऐतिहासिक विजयाची सभा मांचीहिल संस्थान मध्ये उत्साहात पार पडली.

 

 

 

यावेळी मांचीहिल संस्थानचे संस्थापक ॲड .शाळीग्राम होडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत व विश्वस्त डॉ. शैलेंद्रसिंह होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी सभा पार पडली.

 

 

यावेळी संस्थानातील अधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत विखे पाटलांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. संस्थानतर्फे एकमेकांना लाडू भरून व फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला.

 

 

 

यावेळी विश्वस्त डॉ. शैलेंद्रसिंह होडगर यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानुन विखे पाटील साहेब यांना शुभेच्छा दिल्या. तर

 

 

शाळीग्राम होडगर यांनी गेल्या 2 महिन्या पासून मांचीहिल संस्थानातील 350 अधिकारी व कर्मचारी यांनी राधाकृष्ण विखे यांच्या विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी अहोरात्र केलेल्या कामाचे मनपूर्वक धन्यवाद देत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, संचालिका नीलिमा गुणे, मुख्य लेखापाल राजू बोंद्रे, प्राचार्य मोहन मोरे, प्रशासकिय अधिकारी दत्ता शिंदे व सर्व युनिटचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *