आश्वी l झुंजार न्यूज

 

 

 

नुकत्याचं झालेल्या विधानसभा निवडणुकी करिता अकोले मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करुन आई , मुलगा , चुलता व नातेवाईक सिन्नर कडे जात असताना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने या चौघाना जोराची धडक देवून फरार झाल्याने हिट अँड रनचा भयानक प्रकार असल्याने यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे .

 

 

 

 

सविस्तर माहिती अशी की , २० नोव्हेबर २०२४ रोजी संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होती राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदार संघाबाहेर मतदार हे मतदानकरिता मिळेल त्या साधनाने आपले कर्तव्य बजावण्याकरिता ये – जात करत असताना एका सामान्य व गरिब कुटुबांतील संतोष झोळेकर , गणेश विकास झोळेकर , अनिकेत सुभाष लगड व ज्योती झोळेकर हे एकाचं कुटुबांतील मतदार आपले मतदान करुन सिन्नरकडे जात असताना देवठाण जवळ बिगर लाईट असणाऱ्या भरधाव येणाऱ्या पिकअपने या चौघांना जोराची धडक देवून फरार झाला . यात अपघातात तिघे जण जागेवरचं मृत्यु झाले तर जख्मी झालेल्या महिलेला उपचाराकरिता संगमनेर नेण्यात आले होते तिचा ही उपचार दरम्यान मृत्यु झाला .

 

 

 

वरील मृत्यु व्यक्ती हे गरिब कुटुबांतील असल्याने अकोले पोलिस स्टेशनला अज्ञात अपघाताची नोंद करुन केस बंद करण्यात आली ” सामान्य माणसांच्या जीवाला खरंच काही किंमत आहे का हा विचार करायला लावणारी..! ही घटना असून हा अपघात हिट अँड रन नुसार झाल्याने पिकअप हा बहिरवाडी येथील या प्रतिष्ठित व्यक्तीचा असून पोलिसाकडून याबाबत उडवा – उडवीचे उत्तरे मिळत असल्याने पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटत असून यांची सखोल चौकशी होवून या कुटुबांला योग्य तो न्याय मिळावा ही मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विजयराव वाकचौरे यांनी केली आहे . तर याबाबात गृहमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले

 

 

 

 

 

याबाबत या घटनेची माहिती कल्पित वाकचौरे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले यांना निवेदनाद्रारे सांगितले असता तत्काळ ना . आठवले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दूरध्वनी करुन या अपघाताची तत्काळ तपास करुन मृत कुटुबियांना न्याय मिळवून दया असे सांगितले तर ८ डिसेबर रोजी ना. आठवले हे नाशिक येथे येणार असून पोलिस आयुक्तांना ही झालेल्या अपघाताचा योग्य तपास करावा म्हणून सांगणार असल्याची माहिती कल्पिश वाकचौरे यांनी सांगितले आहे .

 

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed