{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

कोपरगांव l झुंजार न्यूज

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उंदीरवाडी येथील सभासद किसन राणुबा राऊत यांचा अपघाती मृत्यु झाला होता त्यांच्या वारस पत्नी श्रीमती इंदुबाई किसन राऊत यांना न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीच्यावतीने दोन लाख रूपयांचा विमा धनादेश संचालक त्र्यंबकराव सरोदे व बापूराव बारहाते यांच्या हस्ते प्रदान करण्यांत आला.
           
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी कारखान्याचे सर्व उस उत्पादक सभासद व कामगारांसाठी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन जनता अपघात विमा पॉलिसी घेतली असुन त्याअंतर्गत सदर विमा रक्कम प्रदान केली असल्याचे संचालक त्रंबकराव सरोदे यांनी यावेळी सांगितले. 
         
कारखान्याचे उस उत्पादक सभासद  किसन राणुबा राऊत यांचा रस्ते अपघातात २६ सप्टेंबर २०२३ रोजी मृत्यु झाला होता. कारखान्याचे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी याकामी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडे पाठपुरावा केला व त्यांच्या वारसाकडुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता वेळेत करून घेतली त्यानंतर त्यांना इंशुरन्स कंपनीकडुन २ लाख रूपयांचा अपघाती विमा मंजुर झाला. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची दुरदृष्टी आणि संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे सहकार्य यामुळे योग्य वेळी विम्याची मदत झाली अशी प्रतिकिया श्रीमती इंदुबाई किसन राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *