केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आ अमोल खताळ यांनी निवेदन देऊन केली मागणी

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत मतदारसंघातील रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच खेड सिन्नर एक्सप्रेस वे राष्ट्रीय महामार्ग क्र ६०वरील नागरिकांच्या असलेल्या प्रश्नाबाबत आज केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली

 

 

 

 

 

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असून या रस्त्यांवर सातत्याने अपघात होत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेऊन संगमनेर ते वडगाव पान रस्त्याच्या सुधारणेसाठी ३५.०० कोटी, रा.महामार्ग ५० गणपती मंदिर ते संगमनेर खुर्द रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी २०. ०० कोटी व रा.महामार्ग ६५ ते निळवंडे – कौठे कमळेश्वर – काकडी – कोऱ्हाळे-नांदुरखी रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी २५.०० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन केली आहे

 

 

 

 

 

 

याच बरोबर संगमनेर विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या खेड सिन्नर एक्स्प्रेस वे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. ते काम करताना त्यात काही ठिकाणी अतिरिक्त काम वाढवले जाणार असल्याने त्या महा मार्गाच्या संभाव्य रुंदीकरणामध्ये नागरि कांची घरे, दुकाने बाधित होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत बाधितांना त्याची कल्पना देऊन त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा, तसेच त्याच रस्त्यावर बोटा खिंड ते कऱ्हे घाट दरम्यान मोठ मोठे खड्डे, सर्व्हिस रोड, बस बे, ट्रक टर्मिनल, स्काय वॉक, रस्त्याच्या दुतर्फा देशी झाडांचे वृक्षारोपण आदी अपूर्ण कामे त्वरित करण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत अशी मागणी आमदार खताळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे

 

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed