11 व 12 जानेवारी विविध स्पर्धा सह व्यवसाय वाढीसाठी कार्यशाळा
संगमनेर । झुंजार न्यूज
अहमदनगर जिल्हा हा सहकाराची पंढरी असून सहकारी बँकांची व्यवसाय वृद्धी बरोबर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 11 व 12 जानेवारी 2025 रोजी मालपणी हेल्थ क्लब येथे दोन दिवसीय सहकारी बँक संमेलन होत असून काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असल्याची माहिती बँक असोसिएशनचे अध्यक्ष सत्तेत मुंदडा व अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक शिवाजी जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी उपस्थित होते.

या सहकारी बँक संमेलन बाबत माहिती देताना अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सत्तेन मुंदडा म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील बनवलेला आदर्श सहकार हा संपूर्ण देशासाठी दिशादर्शक आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक सहकारी बँका असून या सर्व बँकांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम केले आहे. 11 व 12 जानेवारी रोजी संगमनेर मध्ये हे बँक संमेलन होत असून शनिवार 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वा. सहकारातील जाणकार नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राज्य बँक असोसिएशनचे माजी अध्यक्ष विश्वास ठाकूर, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे राज्य सहकारी बँक फेडरेशनचे अजय ब्रम्हेचा, प्रतिथयश उद्योगपती राजेश मालपाणी ,गिरीश मालपाणी ,जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, तालुका उपनिबंधक सौ. शुभांगी गोंड, राजेंद्र शिंगी आदी उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसीय निवासी शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांना बँकेचा एनपीए कंट्रोल कसा करावा बँकेचा व्यवसाय वाढवण्याबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे . या बँक संमेलनात जिल्ह्यातील 37 सहकारी बँकांमधील 250 कर्मचारी उपस्थित सहभागी होणार आहेत

तर सुधाकर जोशी म्हणाले की कर्मचारी आणि पदाधिकारी या दोघांमध्ये अधिक समन्वय व्हावा याकरता या दोन दिवशी संमेलनाचे आयोजन होत असून नव्याने 15 जानेवारीपासून तीन तासात चेक क्लिअर करण्याची प्रणाली कार्यान्वित होणार आहे त्यामध्ये अनेक नवीन बदल होणार असून त्याची माहितीही सर्वांना दिली जाणार आहे.

तर नानासाहेब शिंदे म्हणाले की एनपीए व्यवस्था हे मोठे चॅलेंज असून ग्राहकांशी संवाद याबाबतचे मार्गदर्शन कर्मचाऱ्यांकरता महत्त्वाचे ठरणार आहे .

तरी या दोन दिवशीय बँक संमेलनामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सत्तेत मुंदडा, उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे, संमेलन समन्वयक प्रकाश राठी ,सुधाकर जोशी , नानासाहेब शिंदे आदींनी केले आहे.

आंतर बँक क्रीडा स्पर्धा
या बँक शिबिरामध्ये दोन दिवसात पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकरता कॅरम स्पर्धा, कॅश काउंटिंग स्पर्धा ,गायन स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा ,अंताक्षरी स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सत्तेन मुंदडा म्हणाले

