{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आ अमोल खताळ यांच्यावतीने किराणा व संसारपयोगी वस्तु भेट

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील आदिवासी समाजाच्या लताबाई गीताराम बर्डे यांच्या मालकीचे घर लागलेल्याआगी मध्ये जळून खाक झाले. या आगीमध्ये त्यांच्या२ शेळ्या २ बकरे आणि संसार पयोगी वस्तू असे लाखो रुपयाचे नुकसान होऊन बर्डे कुटुंबीयांचा संसार उघड्यावर पडला.या कुटुंबियांची आ अमोल खताळ यांच्या सुविध्य पत्नी निलमताई खताळ यांनी किराणा ब्लांकेट आणि ताडपत्री भेट देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावला.

 

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील लताबाई गीताराम बर्डे या आदिवासी समाजाच्या महिला रहात आहे. त्या काल आपल्या घरात दिवा लावून गावात बाळू मामाच्या पालखी आली त्यामुळे दर्शना साठी बर्डे या गेल्या होत्या. रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली. या आगीत त्यांचा सर्व संसार जळून खाक झाला . तसेच त्या घराच्या शेजारी बांधलेल्या २ शेळ्या २ बकरे होरपळून मृत्युमुखी पडले त्यामुळे या कुटुंबीयाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे

 

 

 

 

 

लताबाई बर्डे यांच्या राहत्या घराला आग लागली असल्याची माहिती गावचे सरपंच अशोक खेमनर यांना समजली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करून ती आग विझवली होती दुसऱ्या दिवशी सकाळी गावचे सरपंच कामगार तलाठी आणि पोलीस पाटील यांनी घटना स्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *