ग्राममहसूल घुलेवाडी व संगमनेर तहसील कार्यालयाचा उपक्रम

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागासाठी१०० दिवसाचा कृती आराखडा दिलेला आहे.त्याच कृती आरा खड्याच्या माध्यमातुन सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जाणार यासाठी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आ अमोल खताळ यांनी केले आहे

 

 

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्राममहसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने क्षत्रिय कार्यालयांसाठी १०० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत पावबाकीच्या मारुती मंदिराच्या प्रांगणात आयोजित महसूल शिबिराचे उद्घाटन आ अमोल खताळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.या यावेळी व्यासपीठावर तहसीलदार धीरज मांजरे माजी उपनगराध्यक्ष जावेद जागीरदार भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भारत गवळी राहुल भोईर राजेंद्र सांगळे दिलीप रावळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

आ खताळ म्हणाले की राज्यातील महा युती सरकार राज्य शासन जनतेच्या हिता साठीचे अनेक लोकाभिमुख निर्णय घेत आहे जमिनीची तुकडा नियमाकुल करणे साठी पूर्वीच्या काळी २५ %फी आकारली जात होती.मात्र ती रक्कम जास्त झाली असल्यामुळे बरेच जण ती रक्कमच भरत नव्हते.मात्र राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्याने राज्य शासनाने तुकडे नियमकुल करण्या साठीची फी५% करण्याचा निर्णय घेतला. शासन आपल्यादारी या युक्तीप्रमाणेशहरा लगत घुलेवाडी सुकेवाडी गुंजाळवाडी कासारवाडी या भागाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या भागा तील नागरिकांच्य अडीअडचणी महसूल शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सोडविल्या जाणार आहे.त्यामुळे या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ खताळ यांनी केले आहे

 

 

 

 

 

जमिनीचे तुकडे नियमाकुल करण्याचे धोरण राज्य शासनाने आणले आहे. त्या साठी शासनाने शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्या बाबत निर्देश दिले आहे. तुकडे नियमाकुल करण्याचे धोरण सर्वसामान्य जनतेला समजावे. यासाठी दोन दिवस घुलेवाडी व गुंजाळ वाडी या महसूल गावात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा या दोन्ही गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा

 

 

श्री धीरज मांजरे ( तहसीलदार संगमनेर ) 

 

 

महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये राज्याचे तत्कालीन महसूलमंत्रीराधाकृष्ण विखे यांनी महसूल पंधरवाडा हा उपक्रम सुरू केला होता असाच महसूलपंधरवाडा उपक्रम महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली राज्याचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केला जाणार आहे या महसूल पंधर वड्याच्या माध्यमातून आपल्या महसूल विषयक असणाऱ्या अडीअडचणी सोडविल्या जाणार आहेत त्याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed