शालेय विद्यार्थांना वहया वाटप करुन केली शिवजयंती साजरी
आश्वी । झुंजार न्यूज
कै.कुंडलिक धोंडीबा पा.गायकवाड शैक्षणिक सामाजिक सेवाभावी संस्था आश्वी परिसरात विविध उपक्रम राबवित असुन त्यातुन विद्यार्थ्यांना इतिहासाची प्रेरणा मिळत आहे त्यामुळेच संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्विय सहाय्यक बापुसाहेब गायकवाड यांनी केले

आश्वी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मांढरे वस्ती येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त मोफत वहया वाटप प्रसंगी केल यावेळी उपसरपंच बाबा भवर ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे ग्रा.प.सदस्य संजय भोसले सोपान सोनवणे माजी सदस्य संतोष भडकवाड बाबासाहेब गायकवाड मनोज भंडारे भारती नागरे स्वाती ढमक वैशाली गावडे कै.कुंडलि धोंडीबा गायकवाड सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पत्रकार संजय गायकवाड सचिव सौ.जयश्री गायकवाड विश्वस्त सौ.मनिषा जाधव अदिनाथ जाधव सचिन पोपळघट कृष्णा हारदे आदि उपस्थित होते यावेळी राजमाता जिजाऊ माता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेजे पुजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले

शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ले यांची माहिती व्हावी व त्यांनीच पुढील काळात या गड किल्ल्यांचे महत्त्व व संवर्धनासाठी योगदान द्यावे या उद्देशाने सुमारे १५० विदयार्थोना किल्याचा फोटो व त्याची माहीती असल्याल्या वह्या मोफत दिल्या बद्दल कै. कुंडलीक धोडींबा पाटील गायकवाड सेवाभावी संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मुख्यध्यापक बाळकृष्ण भालेराव यांनी मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजश्री महामिणे यांनी केले तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले

