{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल संगमनेर मध्ये नागरी सत्कार

लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांची उपस्थिती

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या समितीचे अध्यक्ष असलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांचा बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वा. थोरात महाविद्यालयातील के.बी. दादा सभागृह येथे लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सत्कार आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सौ.दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

Oplus_131072
या सत्कार समारंभ बाबत अधिक माहिती देताना सौ.तांबे म्हणाल्या की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने संगमनेरचे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून 500 पानांचा अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केला होता. यावरूनच केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या समितीचे नेतृत्व करणारे प्रा.रंगनाथ पठारे हे संगमनेर तालुक्याचे असून संगमनेर व अहमदनगर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.

Oplus_131072
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या प्रा.रंगनाथ पठारे यांचा जयहिंद लोकचळवळ,सह्याद्री परिवार व संगमनेर तालुक्यातील साहित्य प्रेमी, सर्व पत्रकार यांच्या वतीने बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी पाच वा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील केबी दादा सभागृहामध्ये मा.महसूल व शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा गौरव करण्यात येणार.

Oplus_131072
यावेळी आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध मान्यवर व साहित्यप्रेमी, सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तरी, या गौरव सोहळ्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व साहित्य प्रेमी, नागरिक, बंधू-भगिनी, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयहिंद लोकचळवळ, सह्याद्री परिवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ व साहित्य परिषदेने केले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *