आश्वी । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाची सांगता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी संगमनेर भूषण पुरस्काराचे वितरण आ. सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

गुरुवार दि. २७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनात विविध प्रकारचे आकर्षक शेती विषयक स्टॉल भरण्यासाठी उपलब्ध होते. या प्रदर्शनात असणारी बुटकी म्हैस संगमनेरकरांसाठी विशेष आकर्षण ठरली. मुंबई येथील प्रसिद्ध शिवशाहीर चंद्रशेखर विशे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुंदर असा पोवाडाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. प्रवीण पानसरे यांना संगमनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रात हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या संताजी करपे, युवा उद्योजक म्हणून सतीश व अमृता राऊत, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे डॉ.माणिकराव शेवाळे, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खंडू अण्णा सातपुते व डॉक्टर अपर्णाताई खाडे यांना संगमनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

 

 

Oplus_131072

 

यावेळी आ.तांबे म्हणाले की, संगमनेर कृषी महोत्सवाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे.कृषी प्रदर्शन भरविणे सोपे काम नाही. परंतु संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रविण कानवडे यांनी कृषी प्रदर्शन आयोजित करून मोठ्या जबाबदारीचे काम केले आहे. भविष्यात यापेक्षा मोठे कृषी प्रदर्शन ते भरवतील यासाठी त्यांनी शुभेच्छा देत त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

 

Oplus_131072

 

 

याप्रसंगी सरपंच सेवा संघाचे बाबासाहेब पावशे, राहुल रेळे, राजेश शिंदे, प्रशांत दातीर , डॉ. अमोल कर्पे, डॉ. योगेश गेठे ,डॉ. निलेश कर्पे ,अशोकराव काळे, प्रतीक गाडेकर मान्यवर उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल राऊत, सचिन गाडे, दौलत सातपुते , नितीन अहिरे, भाऊ मस्के आदींनी प्रयत्न केले. 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *