आश्वी । झुंजार न्यूज
गावोगावी बंद अथवा नादुरुस्त झालेले समाज मंदिरे हे समाजातील लोकचळवळीचे प्रतिक असून या समाज मंदिराचा समाज्यातील लोकांना व नविन पिढीला महापुरुषांच्या विचारातील चरित्र , ग्रंथालय व वृत्तपत्रे वाचनालयाकरिता खुले करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदनाद्रारे पचायत समितीतील गट विकास अधिकारी यांच्याकडे केली .

यावेळी निवेदन म्हटले की, पुर्वी गावोगावी समाज उपयोगाकरिता समाज मंदीरांची उभारणी केली होती . या समाज मंदिरामधून अनेक सामाजिक क्रांती घडल्या हे आपणास ऐतिहासिक वाचणातून ज्ञात झाले . त्यामुळेचं आपलेला महापुरुष समजले मात्र पुढील पिढीकरिता होवून गेले महापुरुष समजणे महत्वाचे आहे . त्याकरिता गावोगावी बंद अथवा नादुरुस्त समाज मंदिरे हे समाजाच्या कल्याणाकरिता व ऐतिहासिक ज्ञान प्राप्तीकरिता खुले करण्यात यावे.

समान मंदीर हे लोकचळवळीचे माध्यम असुन या वास्तुचा उपयोग समाज उपयोगीकरिता व्हावा , तसेच नविन पिढीसाठी महापुरुषांचे ग्रंथ , पुस्तके , चरित्र , वृत्तपत वाचण्यात यावे याकरिता ग्रंथालय , वाचनालय म्हणून समाज मंदिराचा उपयोग व्हावा तसेचं तरुणांना व्यायामशाळा म्हणून उपयोग झाला पाहिजेल याकरिता बंद असलेले समाज मंदिरे खुले करा , नादुरुस्त असणारे समाज मंदिरे दुरुस्त करा अशी मागणी संगमनेर पचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते अविनाश नानासाहेब तांबे , केतन अरुण लव्हाटे , सुनिल तात्यासाहेब थेटे , विकास साहेबराव गायकवाड आदीनी निवेदनाद्रारे केली

