औषधनिर्माण शिक्षण आणि उद्योग यामधील सहकार्यावर भर
काष्टी । झुंजार न्यूज
काष्टी येथील मा.श्री.बबनरावजी पाचपुते विचार धारा ट्रस्ट चे परिक्रमा शैक्षणिक संकुलनातील परिक्रमा फार्मसी कॉलेजच्या वतीने “ब्रिजिंग अॅकॅडेमिया आणि इंडस्ट्री: प्रगत औषधनिर्माण शिक्षणासाठी औद्योगिक गरजांशी संलग्नता” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन सेमिनार ८ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या सेमिनारला संपूर्ण भारतभरातून १००० हून अधिक प्रतिनिधी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुण्यांमध्ये परिक्रमा ग्रुपचे सीईओ मा. श्री. अॅड. प्रतापसिंह बबनरावजी पाचपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल पुंड, परिक्रमा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मल, सेमिनार संयोजक डॉ. निकुंज सोलंकी, समन्वयक डॉ. सोनल सोलंकी आणि संपूर्ण फार्मसी महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्यावर भर या सेमिनारमध्ये औषधनिर्माण शिक्षणाला औद्योगिक गरजांशी कसे जोडले जाऊ शकते, यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित शिक्षण, संशोधन आणि उद्योगांशी प्रत्यक्ष सहकार्य यावर भर देण्याची गरज वक्त्यांनी अधोरेखित केली.
मुख्य सत्रात प्रख्यात तज्ज्ञांनी व्याख्याने दिली, त्यामध्ये
🔹 डॉ. शिवानी देसाई –सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे
🔹 डॉ. अश्वनी पाटील –डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, पुणे
🔹 डॉ. हेमंत तावले –आरकेएच फार्मास्युटिकल कन्सल्टन्सी, नवी मुंबई
संशोधन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), औषध विकासातील नवकल्पना आणि नियामक चौकटींचे औषधनिर्माण क्षेत्रातील महत्त्व यावर यावेळी सखोल चर्चा झाली.
सेमिनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या मान्यवरांचे अभिनंदन
या राष्ट्रीय स्तरावरील सेमिनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टचे संस्थापक माजी मंत्री मा. श्री. बबनरावजी (दादा) पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई बबनरावजी पाचपुते, सचिव मा. आमदार विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अॅड. प्रतापसिंह बबनरावजी पाचपुते, अॅकॅडेमिक डायरेक्टर मा.सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते, मुख्य प्रशासकीय अधिकारी व अतिरीक्त कार्यकारी अधिकारी श्री. अनिल पुंड, डेप्युटी अॅकॅडेमिक डायरेक्टर प्रा. डॉ. संजीव कदम पाटील तसेच परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. मोहन धगाटे, प्राचार्य डॉ. सुदर्शन गिरमकर, प्राचार्य डॉ. पी. ए. इथापे, प्राचार्य डॉ. रमेश शिंदे यांनी सर्व स्टाफ व आयोजकांचे अभिनंदन केले .
भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राशी शैक्षणिक संस्था जुळवून आणण्याची गरज अधोरेखित केली.
“उद्योगासोबत शिक्षणसंस्थांची भागीदारी गरजेची” – डॉ. निकुंज सोलंकी
सेमिनारचे संयोजक डॉ. निकुंज सोलंकी यांनी सांगितले की, “सध्याच्या काळात औषधनिर्माण उद्योगाची गरज ओळखून शिक्षणपद्धती विकसित करणे आवश्यक आहे. उद्योग आणि शिक्षणसंस्थांमध्ये प्रत्यक्ष सहकार्य वाढल्यास विद्यार्थी अधिक सक्षम होतील.”
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ. सुनील निर्मल आणि अॅड. प्रतापसिंह पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण आणि संशोधनाकडे वळण्याचा सल्ला दिला.
फार्मा अन्वेषण २०२५ – राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन या निमित्ताने पार पडलेल्या या सेमिनारमुळे औषधनिर्माण शिक्षण क्षेत्रात नवा दृष्टीकोन निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांना उद्योगासोबत जुळवून घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
