100 दिवशीय टी बी कार्यक्रम

आश्वी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमानिमित्त जनजागृती करण्यात आली. क्षयरोग दिनाच्या निमित्ताने गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.
Oplus_131072
पिरामल स्वास्थ्यचे व नीती आयोगाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिनाचा निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रम व रॅलीमध्ये मुख्याध्यापक सोनवणे , डॉ अमोल उगलमुगले , आशा सेविका सौ शोभा गायकवाड , सौ उषा कदम , श्रीमती सुनिता मुन्तोंडे गणेश जाधव , अशोक भारती आदी उपस्थित होते.
Oplus_131072
याप्रसंगी टीबी हरेगा- देश जितेगा, टीबी रोके-गरिबी मिटाऐ , टीबीचा धोका कधी सांगून येत नाही , टीबीला लपवायचे नाही , हरवायचे , अशा अनेक घोषणा देण्यात आल्या.
Oplus_131072

कोविड जनजागृतीसह क्षयरोगाची माहिती देण्यात आली. डॉ अमोल उगलमुगले यांनी क्षयरोगाबाबात मार्गदर्शन केले. एकत्र निदान, उपचार आणि काळजी हे सर्व क्षयरुग्णांना बरे करण्याचे सूत्र असल्याची माहिती दिली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *