लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवजयंती उत्सव समिती व स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका यांच्यावतीने रविवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता संगमनेर बस स्थानकासमोर भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे  यांच्या उपस्थितीत होणार आहे

 

 

 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका तसेच शिवजन्मोस्तव सोहळा समितीच्या वतीने मोठ्या आनंदाने साजरी होणार आहे.

 

 

Oplus_131072

यासाठी संगमनेर बस स्थानक येवले चहाच्या समोर भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व युवक आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते होणार आहे.

 

 

Oplus_131072

संगमनेर शहर हायटेक बसस्थानक हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पूर्ण झाले आहे. या बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा व्हावा. याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

 

 

Oplus_131072

आमदार सत्यजित तांबे यांनी ही जागा परिवहन विभागाकडून मिळवली असून याकरता एक कोटी रुपये निधी मिळवला आहे. लवकरच येथे महाराजांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभा राहणार आहे.

 

 

Oplus_131072

याचबरोबर शिवजन्मोत्सव निमित्त भव्य मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. यावेळी रविवारी रात्री मंदिर देखाव्याच्या उद्घाटनानंतर, मैदानी खेळ, डीजे ,ढोल ताशांचा गजर ,आतिषबाजी ,सहासी खेळ आणि भव्य मिरवणूक निघणार आहे.

 

 

Oplus_131072

याचबरोबर सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन होणार असून दिवसभर हे मंदिर सर्वांसाठी खुले राहणार आहे.

 

 

 

 

तरी तालुक्यातील सर्व तमाम नागरिक व शिवभक्त यांनी या शिवमंदिर देखाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व शिवजन्मोत्सव सोहळा उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका व शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed