आश्वी । झुंजार न्यूज
अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यादेवीनगर या नामातंराकरिता पुढाकार घेणाऱ्या जिल्हयाचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा धनगर समाज्याच्या वतीने सन्मान करण्यात आला .

जिल्हयातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण असून गेल्या कित्येक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे याकरिता विविध स्तरावरुन मागणी होत होती . अखेर महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळात हा सुवर्ण क्षण येवून जिल्ह्याला अहिल्यादेवी नावास मंजूरी मिळाली याकरिता पालकमंत्री म्हणून ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावत नामातंरासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचा जिल्हयातील सर्व धनगर समाज्यावतीने सन्मान करण्यात आला .

यावेळी धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जऱ्हाड पाटील , अश्वी गावचे प्रतिष्ठ व्यापारी सुमतीलालसेठ गांधी , सोनू शेठ गांधी , अनिल जऱ्हाड , संदीप बाचकर , राजू होडगर , गणेश जऱ्हाड नवनाथ ताजणे भीमा शिंदे तेजस खेमनर योगेश जऱ्हाड पंकज नाके सुरेश जऱ्हाड जानकीराम गायकवाड अनिल म्हसे आदिसह धनगर समाजाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते .
