पानोडी । झुंजार न्यूज
पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतंर्गत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील लगडदरा ते स्वामी समर्थ मंदिर ( हजारवाडी रस्ता ) बाराशे मीटर रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आले .

पानोडी पासून दोन अडीज कि मी अंतरावरील असणाऱ्या लगडदऱ्यात जाण्याकरिता येणाऱ्या अडचणी ओळखून डॉ सुजय विखे पाटील यांनी आपल्या स्व:खर्चातून पाच वर्षापुर्वी हजारवाडी रस्ता स्वामी समर्थ मंदिर ते लगडदरा डोगराजवळून मुरुमीकरण रस्ता बनविला होता त्यांचा फायदा ग्रामस्थांना व लगडदऱ्यातील देवीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांना झाला . मात्र रहदारी व भक्तांचा वाढती गर्दी बघून स्थानिक कार्यकर्त्यानी हा रस्ता डांबरीकरण व्हावे म्हणून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणी केल्याने तत्काळ या रस्त्यास विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी आभार मानले .

या रस्त्याच्या कामाला माजी उपसंरपच नानासाहेब शिंदे , अशोकराव तळेकर , रावसाहेब घुगे , संजय जाधव , भाऊसाहेब चव्हाण , पुंजा पाटील नागरे , राजेंद्र जाधव , हौशाभाऊ जाधव , बाबूराव गोलवड , सचिन जाधव , विखे कार्यालीन अनिल गायकवाड , प्रविण शेपाळ , ठेकेदार किरण तांबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आले .
Post Views: 828
