संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील चिकणी या गावात अधिकृत क्रीडांगण तयार करण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी स्वतः तहसीलदार यांनी गावात येऊन मार्ग काढावा अन्यथा आजपासून आमरण उपोषण करणार असल्याची माहिती उपोषण कर्ते तालुका किसान ( शेतकरी शेतमजूर ) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आनंद निवृत्ती वर्पे व ज्ञानेश्वर चंद्रकांत वर्पे यांनी दिली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात वर्पे यांनी म्हटले आहे कि, चिकणी येथील अधिकृत क्रिडांगण तयार करण्यासाठी वारंवार प्रशासनाला सांगितले आहे. मात्र आमची मागणी मान्य होत नाही. त्यामुळे आता स्वतः तहसीलदार यांनी येऊन मार्ग काढावा. गावातील गट नंबर 04 मध्ये क्रीडांगणाचे काम प्रस्तावित आहे. मात्र तेथे अतिक्रमण आहे. तरी तहसीलदार यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून यावर लवकरात लवकर अतिक्रमणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय चिखली समोर आजपासून आमरण उपोषण करणार आहोत असे उपोषण करते आनंद वर्पे व ज्ञानेश्वर वर्पे यांनी सांगितले आहे.

तरी मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अन्यथा जे घडेल त्यास संपूर्णतः प्रशासन जबाबदार राहील असा इशाराहि उपोषण करते आनंद वर्पे, वैभव वर्पे , यांसह सागर वर्पे , सचिन वर्पे , अभिषेक मुटकुळे राहुल वर्पे , रमेश वर्पे , सचिन वर्पे , भरत वर्पे , संदीप वर्पे , शिवाजी वर्पे , राहुल शिंदे , राहुल वर्पे , वसंत शिंदे , निलेश वर्पे , भाऊराव गुंजाळ , संस्कार वर्पे , दीपक वर्पे , रवी जाधव , निखिल मुटकुळे, गणेश शिंदे, दीपक वर्पे, अमित वर्पे, मयूर वर्पे ,अमोल भोर ,अशितोष वर्पे अंकुश घुले ,बाळासाहेब सहाने ,धनंजय घुले ,मनोज वर्पे ,प्रदीप वर्पे , राजू नवले , सुधीर मुटकुळे विशाल वर्पे , कृष्णा वर्पे , दिगंबर वर्पे आदींनी दिला आहे.
Post Views: 1,062
