संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर येथील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य ,कला ,साहित्य या उपक्रमाद्वारे साहित्य कला मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा संगमनेरची सांस्कृतिक जपवणूक करुन सन्मान केला जातो . या उद्देशाने ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून संगमनेर शहरातील सामाजिक, शैक्षणिक, व धार्मिक , उद्योजक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या वेगवेगळ्या समाजातील महिला वर्गाचां सन्मान करण्यात आला.

 

 

 

Oplus_131072

 

याप्रसंगी तेली समाजातील, जय संताजी महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा सौ शारदाताई कर्पे यानीं समाजातील महिलाचें केलेले संघटन, महिला बचत गटामार्फत केले जाणारे महिलाचें अर्थिक सबलीकरण, संगमनेर काँलेज येथील काँम्युटर विभागात देत असलेले शिक्षण आणि सामाजिक कार्य या बद्दल संगमनेर न.पा.च्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई ताबें, डॉ. सौ.वाणी, अँड.सौ.काळे याचें शुभहस्ते व्यापारी असोसिएशन हाँल संगमनेर येथे प्रधान करण्यात आला.

 

 

 

Oplus_131072

याप्रंसगी संगमनेर शहरातील एकुण २१ कर्तुत्ववान महिलाचां सन्मान करण्यात आला. यावेळी साहित्य कला मंच चे पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

 

Oplus_131072

सौ शारदाताई कर्पे यानां मिळालेल्या सन्मानाबद्दल जय सतांजी महिला मंडळ, तेली समाज व जनतानगर महिला मंडळ व मित्र मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed